शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

जुन्या सखींना उत्सुकता अन् नव्यांना हुरहूर

By admin | Updated: January 25, 2015 00:40 IST

अनेक कार्यक्रमांची क्रेझ : करमणुकीच्या कार्यक्रमांना तर प्रत्येकीलाच यायचंय

सातारा : ‘लोकमत सखी मंच सदस्य झाल्यास दरवर्षी लावण्यांचा भन्नाट कार्यक्रम... हळदी-कूंकूचा कार्यक्रम अन् आकर्षक वाण लुटायचं.. एवढच नाही तर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीलाही जाता येते,’ हे मैत्रिणींकडून एकल्यामुळे नव्याने सदस्य होणार असलेल्या सखींमध्ये हुरहूर लागली आहे. तर जुन्यांना नवीन कोणते कार्यक्रम असतील याची उत्सुकता लागली आहे. सखी मंच सदस्य नोंदणी केवळ १ फेबु्रवारीला एकाच दिवशी होणार आहे. अनेक वर्षे सखींच्या अंत:करणाशी जोडल्या गेलेल्या ‘लोकमत सखी मंच’चे नववर्षात दिमाखदार पदार्पण होत आहे. तब्बल तेरा वर्षांची यशस्वी कारकीर्द असणारे सखी मंच म्हणजे असंख्य सखींनी मिळविलेले एक मुक्त आकाश. जिथं प्रत्येक सखीने अनुभवले आहेत अनेक अविस्मरणीय क्षण. १ फेब्रुवारीला सखी मंच २०१५ ची एक दिवसीय सदस्य नोंदणी होणार आहे. सातारा शहरात अनंत इंग्लिश स्कूल (राजवाड्याजवळ), जिजामाता ज्युनिअर कॉलेज आॅफ एज्युकेशन (कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका) आणि अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (जिल्हा परिषदेजवळ) या तीन ठिकाणी एकाच वेळी सकाळी नऊ वाजल्यापासून सखी मंचची सदस्य नोंदणी होणार आहे. सदस्यांना लकी ड्रॉमधून १८,५०० रुपयांची आटाचक्की अनंत ट्रेडिंग कंपनीमार्फत, माऊली सोफाज्मार्फत २१ हजार रुपये किमतीचा आकर्षक सोफा सेट जिंकण्याची संधीही मिळणार आहे. सोबतच प्रत्येक सखीला सुमुखी ब्युटी पार्लरमार्फत २५० रुपयांचे फेस क्लिनअप मोफत मिळणार आहे. लावणी महोत्सव ८ फेबु्रवारीला होणार असून, याचे स्थळ लवकरच जाहीर केले जाणार आहे. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमात देखील बक्षिसांची लयलूट होणार आहे. तीन भाग्यवान सखींना कास हॉलिडे रिसॉर्टमध्ये कुटुुंबातील तीन व्यक्तींसह एक दिवस मोफत राहता येणार आहे. याअंतर्गत ७,००० किमतीच्या सुविधा (चहा, नाष्टा, जेवण, राहणे) मोफत मिळणार आहे. तीन भाग्यवान सखींना सातारा बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्रामध्ये एक दिवसाचे पॅकेज, एन्ट्री फी, चहा, नाष्टा, जेवण मोफत मिळणार आहेच, शिवाय प्रत्येक सदस्याला तिच्या कुटुंबीयांसह प्रत्येकी ५० रुपयांची सवलत दिली जाणार आहे. भाग्यवान सखींना एस. एस. एंटरप्रायजेसमार्फत दोन इलेक्ट्रॉनिक्स इस्त्री जिंकता येणार आहेत. तर दहा भाग्यवान सखींना हॉटेल सुर्वेज्मार्फत २०० रुपयांचे मोफत लंच किंवा डिनर मिळणार आहे. वर्षभर होणाऱ्या बिलावर दहा टक्के सवलतही मिळणार आहे. १ फेब्रुवारीला प्रत्येकीला मिळणार हमखास बक्षीस ४नव्या-जुन्या सर्व सभासदांसाठी नोंदणी शुल्क नेहमीप्रमाणेच फक्त ३५० रुपये आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी प्रत्येक सभासदांना ५०० रुपये किमतीच्या हमखास गिफ्ट, सोबत १०० रुपये किमतीचे ‘माय डाएट बुक’ आणि सुवणस्पर्श, जेम्स अँड ज्वेलर्स मार्फत तब्बल १,१०० रुपये किमतीच्या बँगल्स मिळणार आहेत. ४ कऱ्हाडची एक दिवशीय सदस्य नोंदणी रविवार, दि. १५ फेबु्रवारीला होणार आहे. अर्ज कऱ्हाड शहरातील ‘लोकमत’ कार्यालय आणि कमिटी मेंबर्सकडे उपलब्ध आहेत. ४हळदी-कुंकवाचे आकर्षक वाणदेखील जिजाऊ प्रतिष्ठानमार्फत प्रत्येक सभासदाला मिळणार आहे. नोंदणी फॉर्म सातारा येथील ‘लोकमत’ कार्यालयात आणि सर्व कमिटी मेंबर्सकडे उपलब्ध आहेत.