शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सातारी पाण्याची राजस्थानला उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 00:33 IST

‘जलयुक्त शिवार’चा डंका : पथक पाहणी करणार; दौऱ्यात १५ जणांचा समावेश

सातारा : ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांचा डंका जुलै २०१५ मध्ये राजस्थानमध्ये वाजला होता. या अभियानाच्या धर्तीवर राजस्थानमध्येही कामे करण्याचा मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचा विचार आहे. जिल्ह्यातील जलयुक्तमधील कामांची पाहणी करण्याकरिता राजस्थानच्या तीन आमदारांचा समावेश असलेले १५ जणांचे पथक सोमवारी सातारा दौऱ्यावर येत आहे. राज्य शासनाने सर्वांसाठी ‘पाणी २०१९’ या उपक्रमांतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबवून राज्यातील हजारो गावे दुष्काळमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. हे अभियान यशस्वी ठरले असून, सातारा जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात २१५ गावांमध्ये अनेक उत्कृष्ट कामे झालेली आहेत. त्यामुळे पाणीसाठा वाढीस मदत झाली आहे. येथील जलयुक्तच्या कामाचा डंका सर्वत्र पोहचला आहे. त्यामुळे येथील कामे पाहण्यासाठी विविध राज्यातील अभ्यासक येत आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनीही याची दखल घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना सातारा जिल्ह्यात झालेल्या कामांच्या सादरीकरणासाठी जुलै महिन्यामध्ये राजस्थानमध्ये निमंत्रित केले होते. राजस्थानमधील झालावाड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विष्णू चरण मल्लिक यांनी नुकतेच एक पत्र जिल्हाधिकारी मुदगल यांना पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या या मोहिमेचा आदर्श घेऊन राजस्थान शासनाने मुख्यमंत्री ‘जलस्वावलंबन अभियान’ नावाने ग्रामीण भागामध्ये अभियान सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्यात लोकसहभागातून जलसंधारणाची उत्कृष्ट कामे झाली आहेत. सातारा जिल्ह्यात या अभियानांतर्गत उत्कृष्टपद्धतीने झालेल्या कामांचे सादरीकरण जयपूर येथे करण्यात आले होते. याची दखल घेऊन राजस्थानमध्ये झालावाड जिल्ह्यात कामे करण्यात येत आहेत. त्याच्या अधिक अभ्यासासाठी १५ जणांचे पथक पाठवत आहोत. हे पथक सोमवारी साताऱ्यात दाखल होत असून, सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत कामाची पाहणी करणार आहे. (प्रतिनिधी) राजस्थानच्या पथकात लोकप्रतिनिधीही... खानापूरचे आमदार नरेंद्र नागर, डगचे आमदार रामचंद्र सुनारीवाल, मनाहरथानाचे आमदार कंवर लाल मीणा, टीना भील, झालावाडचे जिल्हाधिकारी विष्णू चरण मल्लिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामपाल शर्मा, पंचायत समितीचे सभापती कन्हैयालाल पाटीदार, बैनाथ मीणा, रमेशचंद मेघवाल, मोरमबाई तंवर, प्रगतशील शेतकरी राकेश भील, उपवन संरक्षक सी. आर. मीणा, इंद्रजित निमेश, अजित जैन, ब्रजपाल सिंह.