शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पराभव दिसू लागल्याने असंस्कृत प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 23:36 IST

मकरंद पाटील : प्रचारात मुद्दा नसल्याने विरोधकांचे खोटे आरोप राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टाचारी लोकांची परंपरा जयकुमार गोरे : लोणंद नगरपंचायत करण्यामागे विकासकामांचा ओघ हाच उद्देश

लोणंद : राष्ट्रवादी काँग्रेसला लोणंदच्या विकासकामांची दूरदृष्टी आहे. लोणंद नगरपंचायतीला विकासकामाचे रोल मॉडेल बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तीन वर्षांतील कामांचा ओघ पाहून जनतेने राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांना या निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने असंस्कृत प्रचाराचे बीज पेरले जात आहे. राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी उभारलेले विरोधकांचे षड्यंत्र जनताच उधळून लावेल. धास्तावलेल्या विरोधकांना प्रचारात मुद्दा नसल्याने फक्त खोटे आरोप करण्यात ते गुंतलेले आहे,’ अशी टीका आमदार मकरंद पाटील यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, सभापती नितीन भरगुडे-पाटील, पंचायत समिती सदस्य रमेश धायगुडे, अनिता शेळके, मनोज पवार, एन. डी. क्षीरसागर, विठ्ठल शेळके, हणमंत शेळके, योगेश क्षीरसागर, भरत शेळके, मेघा शेळके, गीतांजली क्षीरसागर, दीपाली क्षीरसागर, सुनंदा पानवकर, मंगल कांबळे, भिकुदादा कुरणे आदी प्रमुख उपस्थित होते.आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘तीनच वर्षांत लोणंदचे रूप पालटवून विकासकामे मार्गी लागल्याने विरोधकांच्या डोळ्यात हा विकास टोचत आहे. म्हणूनच खोट्या आरोपांनी वातावरण कलुशीत करण्याचा प्रयत्न केला जातोय; पण लोणंदची जनता सुज्ञ आहे. कोणीही कितीही गप्पा मारल्या तरी विकास हा स्थानिक आमदार म्हणून मीच करणार आहे. विरोधकांच्या बेताल वक्तव्याचा समाचार जनता मतदानातूनच देईल.’आनंदराव शेळके-पाटील म्हणाले, ‘लोणंदमध्ये मी स्वत: लक्ष घालून जिल्हा परिषद आमदार फंडातून कोट्यवधीची कामे केली. १५ वर्षांत काँग्रेसने लोकांना झुलवत ठेवले. त्यामुळेच गतवेळी बदल झाला. तीन वर्षांत झपाट्याने झालेला विकास हे आमदार मकरंद पाटील यांच्या कामाचे प्रतीक आहे. त्यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. खोटे बोलण्यात ख्याती असलेल्या काँग्रेसच्या नादाला जनतेने लागू नये.’ (वार्ताहर)निवडणूक संपल्या की गायब, असे काँग्रेस नेत्यांसारखा मी नाहीनगरपंचायत निवडणूक लागल्यापासून विरोधक माझ्यावर लक्ष ठेवून आहेत. वास्तविक या मतदारसंघाचा आमदार म्हणून इथल्या जनतेने माझ्यावर जीवापाड प्रेम केले आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या दारात गेलो म्हणजे चूक ठरत नाही. उलट विरोधकांच्या विचारांची कीव करावीशी वाटते. माझा वर्षभर लोकांचा सातत्याने संपर्क असतो. निवडणूक संपल्या की गायब होणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांसारखी माझी सवय नाही, असे परखड मत आमदार मकरंद पाटील यांनी मांडले.नितीन भरगुडे-पाटील म्हणाले, ‘लोणंदच्या जनतेने आमदारांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. मतदारसंघातील तीन नगरपालिकेच्या कारभाराचा अनुभव असल्याने आमदार मकरंद पाटील लोणंदमध्ये विकासात्मक बदल घडवतील. राज्यातील मंत्र्यांची आणि बाहेरच्या आमदारांची फौज प्रचारात उतरली असली तरी त्यासाठी स्थानिक आमदार सक्षम आहेत. दुसऱ्याच्या कुबड्या घेण्याची गरज नाही. राष्ट्रवादी आपल्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.’राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टाचारी लोकांची परंपराजयकुमार गोरे : लोणंद नगरपंचायत करण्यामागे विकासकामांचा ओघ हाच उद्देशलोणंद : ‘लोणंद नगरपंचायत होण्यापाठीमागे केवळ काँग्रेसचेच योगदान आहे. विकासकामांचा ओघ वाढावा, यासाठीच हा निर्णय होता. मात्र, विरोधकांनी यात खोडा घातला. जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेत आमदारांच्या घरातीलच दोन संचालक आहेत. सत्तेतून पैसा मिळवून शेतकऱ्यांचे शोषण केले. राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टाचारी लोकांची परंपरा आहे. राष्ट्रवादीने जिल्हा बँक मोडून खाल्ली,’ असा घणाघात माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला.लोणंद नगरपंचायतीचा काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रचार प्रमुख अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल घाडगे, रणजितसिंह निंबाळकर, सचिन फरांदे, किसन वीर कारखान्याचे संचालक मधुकर शिंदे, तालुकाध्यक्ष गुरुदेव बरदाडे, किरण बर्गे, मस्कुअण्णा शेळके, प्रीती नागर, सुभाष घाडगे, उमेश खरात, राजेंद्र डोईफाडे, बाळू शेळके, हेमलता कर्णवर, स्वाती भंडलकर, हेमंत खरात, शैला खरात आदी उपस्थित होते.आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे. पीक कर्जाचे वाटप, पीक पाहणी केल्यावरच द्या, हे न्यायाचे नाही. पिकं बघायला आल्यावर त्यांना दांडके काढून बसा. विकासाची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसच्या कोट्यवधींची विकासकामे आम्ही करून दाखवू,’ असे अश्वासनही त्यांनी दिले. अ‍ॅड. बाळासाहेब बागवान म्हणाले, ‘लोणंदची सत्ता राष्ट्रवादीकडे विकासाचे वाटोळे झाले आहे. ज्या लोकांची नीतिमत्ता पाहून आम्ही बाजूला सारले त्यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काय विकास साधणार आहे. आणि अशा भ्रष्ट स्थानिक नेत्यांसाठी आमदार गल्ली बोळात फिरत आहेत. रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, ‘बाळासाहेब बागवानांना लोणंदच्या विकासाची जाण आहे. बाहेरून येऊन पोकळ काळजी दाखविणाऱ्यांचे हे काम नाही. फलटणच्या राजे मंडळींनी औद्योगिक वसाहतीत स्वत:चे ठेकेदार नेमलेत. आणि वाड्यावर येऊन ते हप्ता पोहोच करतात. हप्तेगिरी करणारी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लोणंदपासून दूरच ठेवा.’ (वार्ताहर)दम असेल तर बारामतीला जाणारे पाणी थांबवून दाखवा..लोणंदची निवडणूक एकाच नावाभोवती फिरतेय, ती म्हणजे बाळासाहेब बागवान. कारण, त्यांना थोपविण्यासाठी एका आमदाराला अधिवेशन सोडून लोणंदमध्ये तळ ठोकावा लागतो. बदलत्या आणि बहरत्या लोणंदचे स्वप्न दाखविणारी राष्ट्रवादी पार्टी ही नॅशनल करप्ट पार्टी आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे. काँग्रेसने लोणंदमध्ये पिण्याच्या पाण्याची आखलेली योजना राष्ट्रवादीने मोडीत काढली. भूमिपूजनाच्या कोनशिलाही ठेवल्या नाहीत. लोणंदला पाण्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी बारामतीला जाणारे पाणी थांबवून दाखवावे. आम्हाला वाई-फलटणचे वारे अजून लागले नाही. लोणंदकरांनी ती हवा डोक्यात घेऊ नये, असे आमदार जयकुमार गोरे म्हणाले. ज्या आमदारांना लोणंद शहर नीट माहीत नाही, ते विकास काय करणार आहेत. नगरपंचायतीची पहिली अधिसूचना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढली. ती बेकायदेशीर म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची विचारांची दिवाळखोरी समोर आली आहे, अशी घणाघाती टिका अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांनी केली.