शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण करणाऱ्यांवरच कोसळले संकट!

By admin | Updated: September 2, 2014 00:03 IST

पाचवड : पुणे-बंगळूर महामार्गावरील समस्यांतून पोलीसही सुटले नाहीत

कवठे : गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या एस्कॉर्टसाठी निघालेल्या पोलीस जीपला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड, ता. वाई येथे भीषण अपघात झाला असून, त्यामध्ये चार पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले असून, पोलीस जीपचा चक्काचूर झाला आहे. महामार्गावरील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे वाहनचालकांच्या जीवावर कशा प्रकारे उठल्या आहेत? याचेच जिवंत उदाहरण यानिमित्ताने सर्वांसमोर आले आहे.रविवार, दि. ३१ आॅगस्ट रोजी मंत्र्यांच्या एस्कॉटसाठी असल्याने वाठार, ता. कोरेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी मधुकर सावळाराम जाधव (वय ५६) हे जीप (एमएच ११ ए बी २३८८) आणि वाई पोलीस स्टेशनचे बाळासाहेब धर्मू जाधव (वय ५३) , सोमनाथ बल्लाळ (वय ५३) व अरविंद गावित (वय ३५) या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन सकाळी सात वाजता पाचवड, ता. वाई या ठिकाणी आली असता महामार्ग ओलांडत असता सातारा दिशेने रोडवर वाहने असल्याने ही पोलीस जीप रस्त्याच्या मध्यावर थांबली. त्याचवेळी सातारावरून पुण्याकडे निघालेला ट्रकने पोलीस जीपला पाठीमागून धडक दिल्याने जीप गोल-गोल फिरून पलटी झाली व चारही कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. ट्रकचालक नागराज बसनप्पा कुंभार (वय २८, रा. रिटेहळी ताा हेरेगिरी जि. हवेरी कर्नाटक) याला भुर्इंज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदने करीत आहेत.दरम्यान, महामार्गाला जागोजागी अपुऱ्या सोयीसुविधा आहे. वास्तविक, ज्याठिकाणी जंक्शन आहे, तिथे महामार्गाला क्रॉसिंगच्या ठिकाणी मोठी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, महामार्गावर असे कुठेही दिसत नाही. गेल्या दोन वर्षांपासून महामार्गावरील कामे पूर्णपणे बंद आहेत. कामे अर्धवट असल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आवश्यक त्याठिकाणी भुयारी मार्ग गरजेचे आहेत. पाचवडसारख्या जंक्शनमध्ये भुयारी मार्गांचा वापर होणे आवश्यक आहे. महामार्ग प्राधिकरण याबाबत सक्ती करत नाही. वाहने महामार्गाच्या मधूनच रस्ते ओलांडत असतात. दोन मार्गांच्या मधल्या जागेत पुरेसी जागा नाही, एक बसही याठिकाणी बसू शकत नाही. बस आडवी उभी राहिली तर दोन महामार्गांवर ती येते. जोपर्यंत तांत्रिक त्रुटी दूर केल्या जात नाहीत, तोवर हे अपघात टाळता येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांनी उपाययोजना केल्या नाहीत तर आणखी मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)