शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत जागृती फर्ममध्ये गुंतवणूकदारांची गर्दी

By admin | Updated: September 17, 2015 00:52 IST

अद्याप तक्रार नाही : राज गायकवाडच्या अटकेने खळबळ; शेळीपालनातून रक्कम दहापट करण्याचे आमिष

सांगली : शेळीपालनातून रक्कम दहापट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी जागृती अ‍ॅग्रो फूडस् इंडियाचा प्रमुख राज गणपतराव गायकवाड याला कर्नाटकात अटक झाल्याने सांगली जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. बुधवारी गुंतवणूकदारांनी जागृती फर्मसमोर गर्दी करून पैसे परत देण्याची मागणी केली. याबाबत पोलिसांत एकही तक्रार दाखल झालेली नाही. शेळीपालनातून पैसे दहापट करून देण्याचे आमिष दाखवून जागृती अ‍ॅग्रोने महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात जाळे विणले आहे. तडसर (ता. कडेगाव) व बेळंकी (ता. मिरज) या ठिकाणी जागृतीने प्रकल्प उभारले आहेत. जिल्ह्यातील अनेकांनी यात गुंतवणूक केली आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील संतपूर पोलीस ठाण्यात राज गायकवाडविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याला सोमवारी रात्री कर्नाटक पोलिसांनी सांगलीतून जेरबंद केले. त्याचे वृत्त बुधवारी जिल्ह्यात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे खळबळ उडाली. गुंतवणूकदारांनी येथील मार्केट यार्डातील ‘जागृती’च्या कार्यालयात चौकशीसाठी गर्दी केली होती. अनेकांनी गुंतविलेले पैसे तातडीने परत देण्याची मागणी केली. गुंतवणूकदारांचा ओघ सुरू होता. सांगली पोलिसांनीही जागृती अ‍ॅग्रोची माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे, पण एकही तक्रार पोलिसांत दाखल झालेली नाही. (प्रतिनिधी)