शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रुद्रेश्वर दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:22 IST

मल्हारपेठ : ‘हर हर महादेव ... रुद्र्रेश्वराच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात हिरव्यागार निसर्गरम्य सह्याद्र्रीच्या कुशीत येराडवाडी, ता. पाटण येथील रुद्र्रेश्वराचा भंडारा सोमवारी पार पडला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.मल्हारपेठपासून तीन किलोमीटरवर असणाऱ्या येराडवाडीनजीक सह्याद्र्रीच्या डोंगररांगात वसलेले पांडवकालीन स्वयंभू रुद्र्रेश्वर देवालय आहे. या देवालयात सोमवारी पहाटेपासूनच महाभिषेक, रुद्र्राभिषेक, होमहवन असे विविध धार्मिक ...

मल्हारपेठ : ‘हर हर महादेव ... रुद्र्रेश्वराच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात हिरव्यागार निसर्गरम्य सह्याद्र्रीच्या कुशीत येराडवाडी, ता. पाटण येथील रुद्र्रेश्वराचा भंडारा सोमवारी पार पडला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.मल्हारपेठपासून तीन किलोमीटरवर असणाऱ्या येराडवाडीनजीक सह्याद्र्रीच्या डोंगररांगात वसलेले पांडवकालीन स्वयंभू रुद्र्रेश्वर देवालय आहे. या देवालयात सोमवारी पहाटेपासूनच महाभिषेक, रुद्र्राभिषेक, होमहवन असे विविध धार्मिक कार्यकम सुरू होते. दुपारी बारा वाजता पांडुरंग महाराज-नाडोलीकर यांचे काल्याचे कीर्तन, दहीहंडी व नंतर महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम होऊन पारायण सोहळ्याची सांगता झाली. सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. महिला भाविकांची संख्या जास्त होती. मंदिरासमोर पडणारा धबधबा भाविकांना आकर्षित करीत होता. दाट वनराई असल्याने अनेक सहकुटुंब आलेले भाविक रिमझिम पावसात कुटुंबासमवेत निसर्गाचा आनंद लुटत असल्याचे चित्र दिसत होते.दिवसभर पाऊस असतानाही पाटण-कºहाड तालुक्यातील भाविक, विशेषत: महिला भविकांची संख्या मोठी होती. डोंगराच्या पायथ्यापर्यंत रस्त्याची सोय झाल्यामुळे अनेक भाविक पायथ्यापर्यंत वाहने घेऊन येत होते. पावसात चिंब भिजणारी तरुणाईचे दर्शन दिवसभर पायथ्याला असणाºया हिरवळीतील मैदानात दिसत होते. मंदिराशेजारी असणाºया भंडारागृहात भाविक महिला झिम्मा फुगडी खेळत होत्या. येराडवाडीतील रुद्र्रेश्वर देवस्थान ट्रस्ट, रुद्र्रेश्वर तरुण मंडळ व ग्रामस्थांनी महाप्रसाद वाटप, दर्शन रांगा, पिण्याचे पाणी यांचे नियोजन केले होते. आकर्षक हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीच्या रांगातून भाविकांचा झरा वाहत असल्याचे रात्री उशिरापर्यंत दिसत होते.