शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांची गर्दी, नेत्यांची डोकेदुखी

By admin | Updated: May 27, 2015 00:56 IST

कृष्णा कारखाना निवडणूक : उमेदवारीची लॉटरी कोणाकोणाला?--कृष्णेचं महाभारत

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २१ जून रोजी होत आहे. कारखान्याच्या इतिहासात यंदा प्रथमच तिरंगी लढतीचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दीही वाढली आहे. त्यामुळे २१ उमेदवारांचे पॅनेल तयार करताना पॅनेलच्या नेत्यांची डोकेदुखी वाढलीय हे नक्की.कृष्णेच्या निवडणुकीत ३३० इच्छुकांनी २९८ उमेदवारी अर्ज दाखल केलेत. मंगळवारी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी केली. त्यात फक्त दोन अर्ज अवैध ठरले. त्यामुळे इच्छुकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी पॅनेलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे.कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल रिंगणात उतरले आहे. त्याविरोधात माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व मदनराव मोहिते यांचे रयत पॅनेल तर डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांचे सहकार पॅनेल रिंगणात उतरत आहे. आजवर दुरंगी लढतीचे चित्र पाहिलेल्या सभासदांना यंदा तिरंगी लढतीचा अनुभव येणार आहे.छाननीमध्ये अर्ज बाद होऊ शकतात हे गृहित धरून सर्वच पॅनेलप्रमुखांनी इच्छुकांना ‘अर्ज भरून तरी ठेवा; मग बघू,’ असे सांगून टाकले. प्रत्यक्षात छाननी छानच झाली म्हणे. त्यामुळे आता अनेक जण गुडघ्याला बांधलेलं बाशिंंग सोडायला तयार नाहीत. सत्ताधारी संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून सुमारे १२० ते १३० जणांचे अर्ज दाखल आहेत. रयत पॅनेलच्या माध्यमातून सुमारे शंभर इच्छुकांचे अर्ज दाखल आहेत, तर सहकार पॅनेलच्या वतीने शक्तिप्रदर्शन करत सुमारे ६० ते ७० अर्ज भरण्यात आले. कारखान्याचे संचालक मंडळ हे २१ जणांचे आहे. त्यामुळे प्रत्येक पॅनेलमधून फक्त २१ उमेदवारांनाच उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे यात कुणाकुणाला उमेदवारीची लॉटरी लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रत्येक पॅनेलप्रमुख सक्षम उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे साऱ्यांचे समाधान होऊ शकले नाही हे निश्चित! नाराजी थोपविणेच पॅनेल प्रमुखांसमोरचे मुख्य आव्हान आहे.आजपासून प्रचाराचे ‘नारळ’कारखाना निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी गेल्या महिन्यापासून सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या आहेत. पण प्रत्यक्ष प्रचाराचे नारळ कोणी फोडलेले नाहीत. अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलचा प्रचार शुभारंभ बुधवार दि. २७ रोजी विंग येथे होत आहे. डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. रयत व सहकार पॅनेलही आपला अधिकृत प्रचार शुभारंभ कधी करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.