शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कोळेतील थांबा बनला अपघाती क्षेत्र!

By admin | Updated: July 17, 2017 14:44 IST

चालकांची कसरत : एकीकडे चढण तर दुसरीकडे उतार

आॅनलाईन लोकमतकुसूर (जि. सातारा), दि. १६ : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील कोळे बस थांब्यावरील चौकात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी असलेल्या चढामुळे अवजड वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. परिणामी या ठिकाणचा थांबा अपघातीक्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांतून होत आहे.

कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील कोळे येथील बस थांब्याच्या दक्षिणेला नवीन वसाहत तर उत्तरेला कोळे गावात जाण्यासाठी जोडरस्ता असल्यामुळे या ठिकाणी चौक निर्माण झाला आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी मागार्चे रूंदीकरण करण्यात आले आहे. यावेळी रस्त्याची पूर्णत: रचनेत बदल झाला आहे. पूर्वी जेथे चढ तेथे उतार, व ज्याठिकाणी उतार तेथे चढ झाला आहे. परिणामी या मार्गावरील जोडरस्त्यावरून येणाऱ्या वाहन चालकांचे अंदाज चुकत आहेत. कोळे येथील कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याची रचना पूर्व उतार तर पश्चिम बाजूस चढ अशी आहे. कोळे गावात जाण्यासाठी तीव्र उतार तर नवीन वसाहतीमध्ये जाण्यासाठी चढण आहे. परिणामी कऱ्हाड-ढेबेवाडी मेनरोडवर येण्यासाठी वसाहतीकडून उतार व कोळे गावाकडून येताना चढ असल्यामुळे दोन्ही बाजूने वाहने वेगात येत असून अंदाज येत नसल्याने हा चौक अपघाती क्षेत्र झाला आहे.

वाढते अपघात टाळण्यासाठी संबंधीत विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांमधून होत आहे. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर गतीरोधक व रस्त्यावरील तीव्र चढ, उतार कमी करण्याची मागणी होत आहे.