शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

संघातील मनोमिलन ठरले निर्णायक!

By admin | Updated: June 22, 2015 22:17 IST

शिक्षक बँक : संघात एकजूट झाली तरी ती टिकविण्याचे मोठे दिव्य

सागर गुजर - सातारा -प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धूळ चारण्याच्या हेतूने पूर्वीचे विरोधक एकत्र आले. मागच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढल्याने दोन शिक्षक संघांना बँकेतील सत्तेपासून बाजूला जावे लागले होते. आता या दोन संघांनी एकत्र येऊन सत्ताधारी शिक्षक समितीला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. ही एकजूट कायम टिकविण्याचे मोठे दिव्य दोन्ही संघांच्या प्रमुखांना तसेच कार्यकर्त्यांना आता पार पाडावे लागणार आहे.बँकेच्या मागील निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक संघ विरोधात लढले होते. या दोन्ही संघांतील मतभेदाचा फायदा विठ्ठल माने यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीला झाल्याने समिती सत्तेवर आली होती. या निवडणुकीतही आमदार शिवाजीराव पाटील गट शिक्षक समितीकडे झुकणार, असे बोलले जात असतानाच अर्ज मागे घेण्यादिवशीच पाटील व थोरात गटाचे मनोमिलन झाले. आमदार पाटील गटाचा पाठिंबा अपेक्षेप्रमाणे निर्णायक ठरला. नऊ जागांपैकी परळी, दहिवडी, तरडगाव, खटाव हे चार सर्वसाधारण मतदारसंघ माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाने जिंकले. राखीवमधील अनुसूचित जाती जमाती व महिला राखीव एक अशा सहा जागा जिंकल्या आहेत. तर संभाजीराव थोरात गटाने वाट्याला आलेल्या १२ जागांपैकी जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, आरळे, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, नागठाणे हे सर्वसाधारण व महिला राखीव, इतर मागास, भटक्या विमुक्त अशा ११ मतदारसंघांवर विजय मिळविला आहे. हे बलाबल पाहता थोरात गटाचे वर्चस्व पाहायला मिळत असून, बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत दोन्ही संघांना वाद टाळून तडजोडी कराव्या लागणार आहेत.संघाचा बोलकिल्ला असलेले जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण-बरड हे मतदारसंघ कायम राखून विजय मिळवून बालेकिल्ला अभेद्य ठेवला.परळी, तरडगाव, नागठाणे मतदारसंघ लक्षवेधीपरळी मतदारसंघ हा समितीचा बालेकिल्ला मानला जातो. शंकर देवरे यांच्या या हुकमी मतदारसंघातच संघाच्या राजकुमार जाधव यांनी समितीला धूळ चारली. तरडगावमध्येही तुकाराम कदम यांनी सत्तांतर करून दाखविले. मागील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत ठरलेले संघाचे राजेंद्र घोरपडे या निवडणुकीत विजयी ठरले.आम्हाला चार जागा मिळाल्या त्यात आणखी चार जागांची भर पडली असती तर चित्र वेगळे दिसले असते. परळीतील बंडखोरी, रहिमतपूर, दहिवडीमधील समितीअंतर्गातील धुसफूस आमच्यासाठी धोकादायक ठरली आहे. याचे चिंतन करण्याची ही वेळ आहे. - विठ्ठल माने, बँकेचे माजी अध्यक्षजिल्ह्यातील शिक्षक सभासदांनी बँकेत सत्तांतर घडवून जो विजय मिळवून दिला आहे, तो संघाच्या दृष्टीने ऐतिहासिक विजय आहे. सभासदांचे हीत डोळ्यांसमोर ठेवून बँकेमध्ये चांगले काम करून दाखवू. - सिद्धेश्वर पुस्तके, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ (थोरात गट)शिक्षक बँकेतील विजय हा संघ शक्तीचा विजय असून, आम्ही सहकार्याची भूमिका घेतल्याने व एकत्र प्रयत्न केल्यामुळे संघाची सत्ता आली आहे. एकोप्याशिवाय बँक चालणार नाही, त्यामुळे संघातील मनोमिलन अबाधित ठेवून काम करणार आहे.- माजी आमदार शिवाजीराव पाटील, अध्यक्ष शिक्षक संघमाजी आमदार शिवाजीराव पाटीलप्रणित संघ हा सत्तेच्या समीकरणात महत्त्वपूर्ण होता, त्यामुळे मनोमिलन घडून आले. मनोमिलनाची एकत्रित ताकद काय असते, ते आम्ही दाखवून दिले आहे. - तुकाराम कदम, राज्य कोषाध्यक्ष, (शिक्षक संघ, पाटील गट)