शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज पालिका सभेत हंगामा

By admin | Updated: April 12, 2016 00:34 IST

अर्धा तास तहकूब : २६ विषयांना बहुमताने मंजुरी; विरोधकांकडून निषेध

गडहिंग्लज : विरोधी नगरसेवकाकडून झालेला ‘ढपला’ शब्दाचा वापर व सत्ताधाऱ्यांनी केलेली माफीची मागणी, संबंधित नगरसेवकांच्या माफीनाम्याशिवाय सभेचे कामकाज पुढे न चालविण्याची नगराध्यक्षांनी घेतलेली भूमिका यामुळे येथील नगरपालिकेच्या विशेष सभेत जोरदार हंगामा झाला. गोंधळामुळे नगराध्यक्षांनी अर्धा तास सभा तहकूब केली. त्यानंतर अजेंड्यावरील २६ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, विरोधी नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणल्याचा आरोप करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. प्रारंभी शासनाकडून वितरित होऊन परत घेण्यात आलेला निधी आणि निधी उपलब्ध असूनही रखडलेले श्री महालक्ष्मी व विठ्ठल मंदिरांचे बांधकाम या मुद्द्यावरच सुमारे तासभर खडाजंगी झाली. महालक्ष्मी मंदिर परिसरातील शाळेच्या आरक्षणाच्या ठिकाणी धर्मशाळेचा चुकीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, प्रस्तावात दुरुस्तीची गरज असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. मंदिराच्या ट्रस्टशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.वाहन विभागाकडे मक्ता पद्धतीने चालक पुरविण्याच्या टिप्पणीतील चुकीच्या दरपत्रकाचा मुद्दा कदम यांनी उपस्थित केला. त्यावेळी मुद्रणदोष असल्याचा खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी केला. मात्र, ही सभागृहाची दिशाभूल असून त्यात ‘ढपला’ असल्याचा आरोप कदम यांनी केला. त्यावेळी माफी मागा, अन्यथा सभागृहातून बाहेर जा, अशी सूचना नगराध्यक्षांनी केली. दोघेही आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे गोंधळात भर पडली.चर्चेत उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, नरेंद्र भद्रापूर, रामदास कुराडे, दादू पाटील, बसवराज खणगावे, उदय पाटील, मंजूषा कदम, लक्ष्मी घुगरे, अरुणा शिंदे, दीपा बरगे यांनीही भाग घेतला. मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. (प्रतिनिधी) सर्व ई-निविदा आॅनलाईन पद्धतीनेच मागविण्यात आल्या आहेत. सर्व विषय आरोग्य व पाणी पुरवठ्याशी निगडित असल्यामुळे जनतेच्या हितासाठीच बहुमताने मंजूर केले. केवळ रस्ते सफाईच्या एका टेंडरमध्येच ६ लाख ६५ हजारांची बचत झाली आहे. वैयक्तिक हेवेदावे काढण्यासाठीच विरोधक सभागृहाचा वेळ वाया घालवत होते. त्यांचा विरोध केवळ आकसापोटी असल्यामुळेच सर्व विषय बहुमताने मंजूर केले.- राजेश बोरगावे, नगराध्यक्षभाजप सरकारचा निषेध!सांस्कृतिक सभागृह आणि वाचनालयासाठी पाच कोटींचा निधी वितरित करून परत घेतल्याबद्दल हारुण सय्यद यांनी भाजप सरकारचा निषेध नोंदविला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यातून केवळ गडहिंंग्लज पालिकेनेच प्रस्ताव पाठविला होता. मात्र, राजकीय आकसातून तो निधी परत घेण्यात आल्यामुळे तमाम ‘गडहिंंग्लज’च्या जनतेचा अपमान झाला आहे. त्यामुळे पाच कोटींचा निधी गडहिंग्लजकरांना सन्मानपूर्वक मिळावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यास दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी दुजोरा दिला.