शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

दुबारचे संकट टळले; उत्पादनाची चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 17:33 IST

वाई : जून महिना कोरडा गेला असतानाही जुलै महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने वाई तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले. असे असलेतरीही पावसाची दमदार सुरुवात होऊनही तालुक्यातील सर्वच धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उत्पादनात घट ...

ठळक मुद्देवाई तालुक्यातील स्थिती

वाई : जून महिना कोरडा गेला असतानाही जुलै महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने वाई तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले. असे असलेतरीही पावसाची दमदार सुरुवात होऊनही तालुक्यातील सर्वच धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या धोम धरणात फक्त ६० टक्के, नागेवाडी धरणात ४३ तर बलकवडी धरणात फक्त ८० टक्के पाणीसाठा आहे. बलकवडी व धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नागेवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. पावसाने या आठवड्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने पाण्याची आवक पुरेशी राहणार नाही. त्यामुळे तिन्ही धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्यास तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्यावर्षी पावसाने सुरुवात उशिरा करूनही नऊ जुलैला कृष्णा नदीला महापूर आला होता. यावर्षी आॅगष्ट महिना उजाडला तरीही तालुक्यातील धरणांची अवस्था चिंतनीय आहे. पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पुन्हा एकदा खरीप हंगाम वाया जातोय की काय या चिंतेने ग्रासला आहे.  वाई तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अतिशय विचित्र आहे. हा तालुका सुजलाम-सुफलाम आहे, असे मानले जात असले तरीही वाई तालुक्याचा पश्चिम भाग अतिवृष्टीचा भाग मानला जातो. वाई शहरासह दक्षिण-उत्तरेला पावसाचे प्रमाण मध्यम असते. तर पूर्वेला पाऊस अतिशय कमी पाऊस पडत असल्याने दुष्काळी परिस्थिती नेहमीच उद्भवलेली असते. अशा या विचित्र पर्जन्यमान असणाºया तालुक्यात यावर्षी पश्चिम भागातही पुरेसा पाऊस न पडल्याने संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाची दाट छाया निर्माण झाली आहे. त्यामुळे वाई तालुका निसर्गाच्या विचित्र अशा परिस्थितीत अडकल्याचे चित्र सध्या दिसत आहे.उत्पादनात घट होण्याची भीती...आॅगष्ट महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्यास यावर्षी उत्पादनात घट होण्याची भीती आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. सध्या सण-उत्सवांना सुरुवात झाल्याने शेतकºयांना ते कसे साजरे करायचे या संकटाने ग्रासले आहे. एकंदरीत बळीराजा काही केल्या निसर्गाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेल, असे सध्या तरी दिसत नाही.