शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

गुन्हेगारीला चाप लावणार : शिवणकर

By admin | Updated: June 13, 2015 00:14 IST

पाटणचाही प्रभार

कऱ्हाड : ‘कऱ्हाड हे संवेदनशील शहर आहे. त्याचबरोबर शहरासह तालुक्यात घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायाही गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे कऱ्हाड उपविभागात कायदा, सुव्यवस्था राबविताना सुरुवातीला या गुन्हेगारी वृत्तींना चाप लावणे आवश्यक आहे. यापुढे उपविभागातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिली. येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात शुक्रवारी उपविभागातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तत्पूर्वी उपअधीक्षक शिवणकर यांनी पत्रकारांशी चर्चा केली.उपअधीक्षक शिवणकर म्हणाल्या, ‘जिल्ह्यात दहिवडी व सातारा उपविभागांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. सातारा आणि कऱ्हाडच्या तुलनेत दहिवडी उपविभागात गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. त्याठिकाणी कायदा, सुव्यवस्था राबविताना कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या नाहीत. सातारा उपविभागात गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. तेथेही आम्ही समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गुन्हेगारी कृत्यांना आळा घातला होता. आता कऱ्हाडमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आहे. मुळात कऱ्हाड हे संवेदनशील आणि जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आजपर्यंतच्या घटनांवरून येथील गुन्हेगारी कारवाया गंभीर स्वरूपाच्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुन्हे रोखण्यासाठी सुरुवातीला गुन्हेगारी कारवाया आणि गुन्हेगारी वृत्तींना चाप लावणे आवश्यक आहे. गुन्हेगारी वृत्तींवर पोलिसांचा वचक निर्माण झाल्यास गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. कऱ्हाडात कायदा, सुव्यवस्था राबविताना महिलांच्या प्रश्नांविषयी आपली आक्रमक भूमिका असेल. महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना असुरक्षित वाटणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्यास प्राधान्य राहील. त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचाराच्याबाबतीतही कडक पावले उचलली जातील. अवैध व्यवसायांवर पोलिसांचा वचक असेल. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कऱ्हाडात काम करताना हीच आमची भूमिका राहील.’ दरम्यान, उपअधीक्षक शिवणकर यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून उपविभागाचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)पाटणचाही प्रभारपाटणचे पोलीस उपअधीक्षक पद रिक्त आहे. गत अनेक महिन्यांपासून या उपविभागाचा कारभार कऱ्हाडचे उपअधीक्षक पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी राजलक्ष्मी शिवणकर येथे रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडेही पाटणचा प्रभार देण्यात आला असून, त्यांना कऱ्हाड व पाटण या दोन्ही उपविभागांत काम करावे लागणार आहे.