शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हिंदकेसरीसह तिघांवर कऱ्हाडात गुन्हा

By admin | Updated: September 27, 2015 00:35 IST

निवडणुकीवरून मारहाण केल्याचा आरोप

नवी मुंबई : वाशी खाडीपुलाखाली होणारे विसर्जन धोक्याचे ठरत आहे. शुक्रवारी रात्री विसर्जनासाठी आलेली एक व्यक्ती वाहुण गेल्याचा प्रकार घडला आहे. पोलीसांनी बंदी केल्यानंतरही मुंबईतुन विसर्जनासाठी गणेशमुर्ती येत असल्याने अनंत चतुर्थीच्या दिवशी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.मानखुर्द परिसरातील गणेशमुर्ती विसर्जनासाठी वाशी खाडीपुलाखाली येत असल्याने अनंत चतुर्थीच्या दिवशी पोलीसांची डोकेदुखी वाढणार आहे. खाडीपुलाच्या मानखुर्द हद्दीच्या भागात परिसरातील गणेशमुर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र वाशीकडील खाडीच्या भागात पुरेशी सोय नसल्याने पोलीसांनी त्याठिकाणी विसर्जनावर बंदी आनलेली आहे. केवळ मच्छिमार बांधवांचा हा नेहमीचा मार्ग असल्याने त्यांच्याच घरगुती गणेशमुर्तींचे त्याठिकाणी होडीतुन विसर्जन होते. मात्र इतर व्यक्तींसाठी धोका असल्याने याठिकाणी त्यांना प्रवेश दिला जात नाही. तशा सुचनाही वाशी पोलीसांनी दिलेल्या आहेत. असे असतानाही मानखुर्द परिसरातील गणेशमुर्ती विसर्जनासाठी त्याठिकाणी आनल्या जात आहेत. पाचव्या दिवशीच्या विसर्जनावेळी सुमारे २०० गणेशमुर्तींचे त्याठिकानी विसर्जन झाले. वाशी पोलीसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करुनही अनेकजन खाडीमध्ये प्रवेश करत होते. शुक्रवारी रात्री देखिल मानखुर्दच्या काही गणेशमुर्ती वाशी खाडीपुलाखाली विसर्जनासाठी आल्या होत्या. यावेळी राजु रामभरोसे (४२) यांचा तोल जावून पाण्यात पडले. पोलीसांनी रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध घेवूनही त्यांचा तपास लागलेला नाही.मानखुर्द येथे बंदोबस्तावर असलेल्या मुंबई पोलीसांकडून त्याठिकाणी आलेल्या गणेशमुर्ती विसर्जनासाठी वाशी हद्दीत पाठवल्यासद जात आहेत. त्यामुळे रविवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी देखिल वाशी खाडीपुलाखाली विसर्जनासाठी मोठ्या संख्येने गणेशमुर्तींचे आगमण होण्याची शक्यता आहे. सदर ठिकाणी दलदलीचा भाग असल्याने गाळात रुतुन अथवा पाण्याच्या प्रवाहात व्यक्ती वाहुण जाण्याची शक्यता आहे. यामुळे नवी मुंबई पोलीसांनी चेंबुर पोलीसांशी संपर्क साधून मानखुर्दच्या गणेशमुर्ती वाशीत पाठवू नये अश्या सुचनाही केलेल्या आहेत. (प्रतिनिधी)