याबाबत औंध पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, वरची अंभेरी (ता. खटाव) येथील घराच्या बाहेर तानूबाई सुखदेव पिसाळ (वय ७५) या बसल्या होत्या. यावेळी चंद्रकांत उत्तम पिसाळ याने लाकडी दांडके घेऊन तानूबाई यांच्या उजव्या हातावर मारहाण केली. अलका उत्तम पिसाळ व सूर्यकांत उत्तम पिसाळ यांनीही तानूबाई यांना चापटी व मारहाण करत ढकलून दिले. पुन्हा न्यायालयाची नोटीस आली, तर तुला व तुझ्या मुलांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दोघांनी तानूबाई यांना दिली. याप्रकरणी तानूबाई पिसाळ यांनी चंद्रकांत पिसाळ, अलका पिसाळ व सूर्यकांत पिसाळ यांच्याविरोधात औंध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
महिलेस मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST