शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षा देशपांडे यांच्यावर गुन्हा

By admin | Updated: March 7, 2017 22:23 IST

झुणका भाकर केंद्र : कुलूप तोडून दोनशे रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप

शाहूपुरी : बसस्थानकातील झुणका भाकर केंद्रात अनधिकृतपणे प्रवेश करून कुलूप तोडून दोनशे रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्यासह चार महिलांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.सातारा बसस्थानकाच्या आगार प्रमुख नीलम गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ५ रोजी दुपारी चार वाजता बसस्थानकातील झुणका भाकर केंद्रामध्ये अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्यासह चार महिलांनी अनधिकृतपणे कुलूप तोडून प्रवेश केला. तसेच दोन रुपयांचे नुकसान केले. यावरून शहर पोलिसांनी वर्षा देशपांडे यांच्यासह चार अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.बसस्थानकातील झुणका भाकर केंद्रामध्ये तिसऱ्या दिवशी महिला ठाण मांडून होत्या. दुपारच्या सुमारास संबंधित महिलांनी केंद्राबाहेर वडापावचीही विक्री केली. गेल्या तीन दिवसांपासून एसटी महामंडळाचे अधिकारी शहर पोलिस ठाण्यात हेलपाटे मारत होते तर दुसऱ्या बाजूला संबंधित महिला झुणका भाकर केंद्रामध्ये तळ ठोकून राहिल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकामध्ये अद्यापही वातावरण तणावाचे आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर झुणका भाकर केंद्राला सील ठोकण्यात आले होते. मात्र, रविवारी दुपारी कुलूप तुटल्याचे आगार व्यवस्थापक नीलम गिरी यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांनी हा प्रकार शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. (वार्ताहर)जेसीबी अखेर झाला गायब !बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राला लावलेले सील तोडल्यानंतर केंद्र उद्ध्वस्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, जेसीबी चालकाला दमदाटी झाल्याने त्याला केंद्रापासून काही अंतरावर उभे राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु तो तेथून निघून गेला. तो अद्याप त्या ठिकाणी फिरकलाच नाही. जेसीबी आणून प्रशासनाला काय करायचं होतं. हे कोणालाच समजलं नाही.