शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोरे बंधूंसह २५० कार्यकर्त्यांवर गुन्हे !

By admin | Updated: March 20, 2015 23:49 IST

आंधळी-दहिवडी धुमश्चक्री : फरार संशयितांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर

गोंदवले : आंधळी दगडफेकप्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह शंभरपेक्षा जास्त व शेखर गोरे यांच्यासह शंभरपेक्षा जास्त अशा एकूण दोनशे ते अडीचशे जणांवर दंगल माजविणे, मारामारी करणे, गंभीर जखमी करणे, शासकीय नोकरावर हल्ला करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, शासकीय आदेशाचा भंग करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आंधळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पदाधिकारी निवडीवरून आमदार गोरे व शेखर गोरे गटांत मोठा वाद निर्माण झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी अनुपस्थितीत राहिल्याने पदाधिकारी निवडीची निवडणूकच पुढे ढकलावी लागली होती. त्यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीचे पर्यवसान तुफान दगडफेकीत झाले. यात दोन पोलिसांसह अनेक कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांच्या वाहनांसह खासगी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तब्बल अर्धा तास तुफान दगडफेक झाल्यानंतर जमाव पांगविण्यात पोलिसांना यश आले. या घटनेमुळे आंधळी, दहिवडीसह संपूर्ण माण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज दिवसभर पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे करीत आहेत. (वार्ताहर)विविध कलमाखाली गुन्हेमाण तालुक्यातील आंधळी व दहिवडी येथे झालेल्या धुमश्चक्री व मारहाणप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये १४३, १४७, १४८, १४९, ३३२, ३३३, ३२६, ४२७, ५०६ या कलमांचा समावेश आहे. दरम्यान शुक्रवारी दहिवडी पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. गुरुवारी नेमणुकीवर असलेले निवडणूक निर्णय अधिकारी ए. पी. तायडे यांचा अद्याप पत्ता लागलेला नसल्याने त्यांच्या जागेवर राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करुण निवडणूक प्रक्रीया पूर्ण करावी, असा आदेश दिल्याचे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत इमेल या कार्यालयाला मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.