शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

सचिवासह १५ संचालकांविरोधात गुन्हा

By admin | Updated: November 27, 2014 00:24 IST

दहिवडी सोसायटी अपहार प्रकरण--लोकमतचा दणका

वाठार स्टेशन : दहिगाव, ता. कोरेगाव येथील दहिगाव विकास सेवा सोसायटीमध्ये २०११ ते २०१३ या आर्थिक वर्षात या सेवा सोसायटीचे सचिव विजय शांताराम कोकणे (रा. देऊर, ता. कोरेगाव) याच्यासह विद्यमान १५ संचालकांनी ६६ लाख ११ हजार ५६८ रुपयांची अपहार केल्याबाबतची फिर्याद लेखापरीक्षक सुचित्रा नलावडे यांनी आज (बुधवारी) वाठार पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून वरील एकूण १५ जणांविरोधात वाठार पोलीस गुन्हा नोंद करण्यात आला आहे.यावरून अधिक माहिती अशी की, !देऊर विकास सेवा सोसायटीमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार‘ हे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर या सोसायटीच्या चौकशीचा तपास सहकार खात्याकडून गतिमान झाला. दरम्यान, याच सोसायटीचे सचिव देऊर शेजारील दहिगाव विकास सेवा सोसायटीचेही काम पाहत असल्याने ‘लोकमत’ने या सोसायटीतही भ्रष्टाचार असल्याचे प्रसिद्ध केले होते. यावरून या दोन्ही सोसायट्यांच्या भ्रष्टाचाराची मालिकाच ‘लोकमत’ने उजेडात आणली होती.अखेर दहिगाव सेवा सोसायटीबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा यांच्या आदेशान्वये या सेवा सोसायटीचे लेखापरीक्षक सुचित्रा नलवडे यांनी या सोसायटीत दि. १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ व १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या आर्थिक वर्षात सचिव कोकणे यांनी व्यवहारातील नोंदीतील फरक, मेंबर शेअर्स यादीतील फरक, बँक चालू ठेव खात्यातील फरक, दुबार कर्जवाटप यामध्ये एकूण ६६ लाख ११ हजार ५६८ एवढ्या रकमेचा अपहार केल्या असल्याची फिर्याद आज बुधवार, दि. २६ रोजी वाठार पोलीस ठाण्यात दिली आहे. या अपहारातील मुख्य सूत्रधार याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दहिगाव विकास सेवा सोसायटीतील अपहाराप्रमाणेच जिल्ह्यात सर्वाधिक अपहार देऊर विकास सेवा सोसायटीत झाला असून, या सोसायटीचा हा लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)सहकार खात्याचे मौन!कोरेगाव तालुक्यातील देऊर, दहिगाव, सेवा सोसायटीतील अपहारात केवळ सचिवांनाच दोषी धरण्याबरोबरच जिल्हा बँकेचे विकास अधिकारी, लेखापरीक्षक यांच्याबाबत सहकार खात्याचे मौन का? अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.