शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार वृक्षतोड अन कोळशाची निर्मिती

By admin | Updated: April 5, 2017 16:15 IST

येरळा तलाव परिसरातील चित्र : सहपालकमंत्री शुक्रवारी करणार पाहणी!

लोकमत आॅनलाईन वडूज : बेसुमार वृक्षतोड करण्याबरोबरीने शासकीय जागेवरच अतिक्रमण करून त्याच ठिकाणी कोळसा निर्माण करीत असल्याचे काही पुरावे येरळा तलाव परिसरात दिसून येत आहेत. मात्र, ज्या विभागांतर्गत ही जमीन येत आहे तो विभाग गुंडगिरीला खतपाणी घालत असल्याचे सदृश चित्र पाहावयास मिळत आहे.

वाळू माफियांना क्लिन चीट कशासाठी हे न उलगडणारे कोडे? तर आहेच. मात्र, महसूल विभाग, येरळवाडी मध्यम प्रकल्प आणि वनविभाग नेमके कोणाला वाचविण्यासाठी धडपडत आहे, या चचेर्ला तालुक्यात उधाण आले आहे.

कायम दुष्काळी भाग म्हणून खटाव तालुक्याचा नामोल्लेख राज्यभर होत असतो. टंचाई जाणवू लागली की प्रत्येक पक्षाच्या नेतेमंडळींचे राजकीय सुगीचे दिवस सुरू होतात, हा इतिहास आहे. या भागासाठी ठोस काही न करता आपली राजकीय पोळी आजपर्यंत बऱ्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी भाजून घेतलेली आहे. नुकत्याच झालेल्या सहपालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत सुद्धा अंबवडे ग्रामस्थ आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्ययेरळा तलाव बचावह्ण यासाठी तोंडी सांगून व लेखी निवेदन देऊन सुद्धा या विषयाला फाटा दिला. या बैठकीत काही नेतेमंडळींनी येरळा पात्रातील वाळूचे लिलाव काढण्यासाठीच्या सूचना मांडल्या तर पात्रात पडलेले मोठेले खड्डे वाळू उपसा करणाऱ्यांकडूनच भरून घ्यावेत, असा मौलिक सल्ला ही देण्यात ते मागे राहिले नाहीत.

पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेती पाण्यासाठी झालेल्या बैठकीत सर्वांनीच पाण्याची मागणी केली. उरमोडीचे पाणी पूर्ण क्षमतेने सोडण्याचीही मागणी सर्वच स्तरावर झाली. परंतु हे पाणी ज्या तलावात सोडण्यात येणार आहे त्या येरळा तलाव परिसराची वाळू माफियांनी काय दुर्दशा केली आहे, हे ज्ञात असताना देखील कोणत्याच लोकप्रतिनिधींनी यावर आवाज काढला नाही, ही तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

नदीच्या पात्रातील बेसुमार खड्डे कोवळ्या जिवांचे जीव घेऊन जात असल्याच्या घटना ताज्या असताना देखील प्रशासन याबाबत गंभीर नाही. येरळा तलाव फुटण्याच्या प्रतीक्षेत हे प्रशासन आहे का?, असा यक्ष प्रश्न जाणकारांमधून उपस्थित केला जात आहे. महसूल विभाग कुंभकर्णी झोपेतून जागा झाला असला तरी तहसीलदार सीमा होळकर यांना या कामी योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे जाणवत आहे. आढावा बैठक संपल्या नंतर विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत सहपालकमंत्री खोत यांनी या विषयी आपण शुक्रवार, दि. ७ रोजी घटनास्थळी जाऊन पाहणी करू, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

तहसीलदारांच्या संगीत खुर्चीचा खेळ...! तालुक्यात चांगले काम सुरू करून विधायक टप्प्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तहसीलदार यांना काहीवेळा (सक्तीच्या) रजेवर जावे लागत आहे. याचे कारण म्हणजे नवीन पदभार स्वीकारणाऱ्यांचा प्रोमिशनल पिरेड होय. त्यामुळे सीमा होळकर यांच्या जागी आता तहसीलदार म्हणून प्रियांका पवार यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी तहसीलदार विवेक साळुंके यांनी अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली. तद्नंतर वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास होळकर यांनी प्रारंभ केला होता. आता या तालुक्यासाठी विकासात्मक ठोस काही तरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यापूर्वीच तहसीलदारांची खुर्ची खेळातल्या संगीत खुर्ची सारखी वारंवार बदलू लागली आहे.