शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अजगराला पाहुणचार.. मगरीची सर्कस !

By admin | Updated: July 18, 2016 00:29 IST

वनखात्याच्या नर्सरीत मुक्काम : सातारा जिल्ह्यात दोन प्राण्यांबद्दल ‘माणुसकीचा विरोधाभास’

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दहा फुटी अजगर अन् सात फुटी मगर सापडल्याने सातारकरांमध्ये चर्चेला ऊत आलाय. एकीकडे भेकराला पकडण्याच्या नादात जखमी झालेल्या अजगराला चिकन-अंडी खाऊ-पिऊ घालण्यात ‘वन्यजीव’ विभागाचे अधिकारी व्यस्त झालेत, तर दुसरीकडे मगरीच्या पाठीवर बसून तिला डिवचण्यात स्थानिक तरुणांनी धन्यता मानली. दरम्यान, मगरीला सातारा येथील वनविभागाच्या नर्सरीत ठेवण्यात आले असून सोमवारी पश्चिम घाटातील मगरिंच्या अधिवास क्षेत्रात तीला सोडण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील धानकल हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसले आहे. या गावात रस्त्याकडेला पडलेल्या अजगराला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. भेकराशी झालेल्या झटापटीत अजगराचा जबडा फाटला होता. त्यामुळे कऱ्हाडात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या जबड्यावर सहा टाक्यांची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्याला ‘वन्यजीव’ विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.  या अजगराला अंडी अन् कोंबडीच्या मांसाचा खुराक दिला जात असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याचे अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रकृती सुधारल्यानंतर त्याला पुन्हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सुरक्षित ठिकाणी सोडले जाणार आहे. दरम्यान, सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील कण्हेर धरणाजवळ सात फुटी मगर आढळली. सध्या त्यांचा प्रणयकाळ असल्याने हे प्राणी जलाशयाच्या काठावर आढळून येतात. येथील गावकऱ्यांनी मात्र प्रथमच मगर पाहिल्याने त्यांचा उत्साह दाटून आला. काही तरुणांनी या मगरीच्या पाठीवर बसून अन् तिला दोरीने बांधून डिवचण्याच्या प्रयत्न केला, तेव्हा चवताळलेल्या मगरीच्या हल्ल्यात कडव नामक (रा. साबळेवाडी) तरुण जखमी झाला. मग मात्र तत्काळ वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले आणि मगरीला पडकडण्यात यश आले. मगर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)