शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

चारशे महिलांच्या उपस्थितीत गायीचे डोहाळे जेवण

By admin | Updated: March 9, 2017 17:14 IST

शेवाळेवाडी-म्हासोलीतील शेतकऱ्याचा अनोखा प्रकार

चारशे महिलांच्या उपस्थितीत गायीचे डोहाळे जेवणशेवाळेवाडी-म्हासोलीतील शेतकऱ्याचा अनोखा प्रकार आॅनलाईन लोकमतउंडाळे : शेवाळेवाडी-म्हासोली, ता. कऱ्हाड येथील प्रगतशील शेतकरी भागवत शेवाळे यांनी आपल्या देशी गाय (गंंगा) हिचे डोहाळे जेवण घातले. यावेळी गावातील महिलांनी गायीची ओटी भरली. विशेष म्हणजे गायीच्या डोहाळे जेवणासाठी गावातील चारशे महिलांनी उपस्थिती लावली.शेवाळेवाडी-म्हासोली येथील भागवत शेवाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करीत असलेल्या गायीचे डोहाळे जेवण घालत प्राणीमात्रावर दया करा, त्यांना आपल्या मुलांप्रमाणे वागणूक द्या, अशी शिकवण दिली आहे. भागवत शेवाळे हे वारकरी सांप्रदायाचे अनुयायी आहेत. ते आपल्या गावाबरोबरच इतर गावांत देखील पारायण मंडळाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहेत.भागवत शेवाळे यांच्याबरोबर वडील नामदेव त्यांचे आजोबा बंडू बुवा या सर्वांनी वारकरी संप्रदाय वाढीसाठी आपले आयुष्य खर्ची घालवले आहे. सध्या त्यांची चौथी पिढी या क्षेत्रात उतरली आहे.गायीचे डोहाळे जेवण घालण्याचा भागवत शेवाळे यांनी निर्णय घेत संपूर्ण गावाला डोहाळे जेवणासाठी आमंत्रित केले आहे. आणि या गायीच्या डोहाळे जेवणासाठी गावासह परिसरातील तब्बल चारशेहून अधिक महिलांनी उपस्थिती लावली होती.यावेळी डोहाळे जेवणासाठी महिलांनी खणानारळांनी गायीचे ओटीभरणही केले. तसेच विधिवत डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला. (वार्ताहर)महिलांनी भरली गंगाची खणानारळाने ओटीयापूर्वी ग्रामीण भागात फक्त महिलांचाच ओटीभरण कार्यक्रम होत असे. गायीचा ओटीभरण कार्यक्रम नाही. मात्र, शेवाळेवाडी-म्हासोलीतील शेतकऱ्याने गंगा गायीचा ओटीभरण कार्यक्रम घेत महिलांना आमंत्रित केले. आणि यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गंगाची खणानारळाने ओटी भरली.शेवाळेवाडी- म्हासोली येथील शेतकरी भागवत शेवाळे यांनी आपल्या गंगा गायीचे डोहाळे जेवण घातले. यावेळी महिलांनी गायीचे पूजन केले. (छाया : ज्ञानेश्वर शेवाळे)