शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

रस्त्यावर कुडकुडणाऱ्यांना मिळालं मायेचं पांघरूण

By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST

‘लोकमत’चा पुढाकार : दिलदार सातारकरांनी दिला मदतीचा हात

सातारा : ऐन कडाक्याच्या थंडीत अपुऱ्या कपड्यात कुडकुडत रात्रभर रस्त्याकडेला झोपणाऱ्या निराधारांना ऊबदार पांघरूण मिळावे, यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनी शाल, चादर, ब्लँकेट अशा वस्तू देऊ केल्या. बुधवारी या वस्तूंचे वाटप केले अन् रस्त्यावर कुडकुडणाऱ्यांना मायेचं पांखरूण मिळालं.निसर्गाच्या लेखी सर्वांना समान न्याय असतो. तो श्रीमंत-गरीब असा भेद करत नाही. खात्यापित्या लोकांच्या डोक्यावर सुरक्षिततेसाठी हक्काचं छत असतं. मुबलक अंथरूण, पांघरूण असतं पण निराधार लोकांचं काय? उघड्यावर राहताना त्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी कोणतीच साधने नसतात. अशा लोकांना सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात देणे गरजेचे असते. ‘लोकमत’ने ‘इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून सातारा शहरातील विविध भागांमध्ये रस्त्याकडेला कुडकुडत बसणाऱ्या निराधारांना मायेचं पांघरूण मिळावं यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला सातारकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.बुधवारी सायंकाळी बसस्थानक परिसरातील अशा निराधारांना ऊबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. येथील रोहन घोरपडे, जितेंद्र कदम, नीलेश धनवडे, रवी पवार, आनंद पंचपोर, युवराज शिंदे, मनोज खडतरे, समीर निकम व धैर्यशील टोणपे या तरुणांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून चादर, ब्लँकेट, शाल नवीन खरेदी करून त्याचे वाटप निराधारांना केले. (प्रतिनिधी)दुपारी कडकडीत ऊन, रात्री कडक थंडी!सातारा : वातावरणातील बदलामुळे ऋतू कधी कूस बदलतो, हेही लक्षात येत नाही. हिवाळा सुरू होऊन दोन महिने झाले पण असह्य उकाड्यामुळे घरात रात्री पंखा सुरू ठेवल्याशिवाय झोप लागणे मुश्किल होते. आता दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे खरी; पण दिवसभर कडकडीत उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. बुधवारी शहरात कमाल ३१.४ तर किमान १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जिल्हाभर थंडीची लाट निर्माण झाल्यामुळे ऊबदार कपडे परिधान करूनच बाहेर पडावे लागत आहे. दुचाकीचालक युवक तोंडाला मास्क बांधून तर युवती स्टोलचा वापर करताना दिसत आहेत. बोचऱ्या थंडीमुळे शरीरावर परिणाम होत असल्यामुळे नागरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रसाधनांचा वापरही करत आहेत.