शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांना मिळेना हक्काचं अंगण!

By admin | Updated: February 22, 2016 00:04 IST

जिल्ह्यातील स्थिती : अडीच हजार इमारती बांधकामाच्या प्रतीक्षेत; मंदिर, समाजमंदिर, खासगी इमारतीत ज्ञानदानाचे काम

सातारा : जिल्ह्यातील २ हजार ४८० अंगणवाड्यांना अद्यापही हक्काचे छप्पर मिळाले नाही. या अंगणवाड्या सध्या मंदिर, समाजाचे सभागृह, खासगी इमारत, प्राथमिक शाळा या ठिकाणी भरविल्या जात आहेत. खासगी संस्थांच्या तुलनेने अंगणवाडीकडेच सामान्य नागरिकांचा ओढा असल्याने शासनाने अंगणवाड्यांसाठी हक्काची इमारत बांधण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सातारा जिल्ह्याला शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे. खासगी शाळांचे पेव फुटले असले तरी विशेषत: ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य पालक आपली मुले अंगणवाड्यांमध्येच आपल्या पाल्यांना दाखल करत असतात. अंगणवाड्यांमध्ये शिक्षणासोबतच मोफत पोषक असा शालेय पोषण आहार दिला जातो. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी अंगणवाड्या वरदान ठरतात. जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागाच्या माध्यमातून २ कोटी ४०लाखांचा निधी पोषण आहारावर खर्च केला जातो. जिल्ह्यामध्ये ८० हजार ५०९ इतके विद्यार्थी अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ३ हजार ८८७ अंगणवाडी सेविका व ३ हजार ८२४ मदतनीस ज्ञानदानाचे काम करत आहेत. ४०० लोकसंख्येच्या खाली असणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये ७८१ सेविका शिकवितात. सध्या २ हजार ३१९ अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती आहेत. शासनाच्या निधीतूनच या इमारतींची डागडुजी केली जाते. मात्र, खासगी जागांतील इमारतींमध्ये गैरसोयींचा सामना करावा लागतो. या खासगी इमारतींच्या बाजूला असणारी अस्वच्छता, आजूबाजूचा गोंधळ यामुळे शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत असतो. तसेच या मुलांना याच बकाल परिस्थितीमध्ये पोषण आहार खावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे तीन-तेरा वाजतात. या पार्श्वभूमीवर हक्काच्या इमारतीत अंगणवाड्या गेल्या तर तेथील शिक्षणाचा दर्जा सुधारणे शक्य होऊ शकते. सातारा जिल्हा परिषद प्रशासनाने आणखी १२५ इमारतींची कामे हाती घेतली आहेत. तसेच ३०८ अंगणवाड्यांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत. ही कामे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून केली जाणार आहेत.