शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दाम्पत्य ठार; दोन मुले गंभीर

By admin | Updated: September 11, 2016 23:53 IST

मालखेड फाट्यावर दुर्घटना : टँकरला धडक देत कार झाडावर आदळली

मलकापूर : कार झाडावर आदळून दाम्पत्य ठार तर त्यांची दोन मुले गंभीर जखमी झाली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले. प्रवीण मोहन तुळसकर (वय ५०), प्रिया प्रवीण तुळसकर (४५) अशी अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. तर प्रथमेश तुळसकर (२५) व पार्थ तुळसकर (२३, रा. १३/२०, ००४ ए सत्यम, जनरल ए. के. वैद्य मार्ग, गोकूळधाम, गोरेगाव-मुंबई) या दोन जखमी मुलांवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव-मुंबई येथील प्रवीण तुळसकर हे पत्नी प्रिया, मुले प्रथमेश व पार्थ यांना घेऊन नागझर-गोवा येथे गेले होते. रविवारी ते तेथून पुन्हा कारने (एमएच ०२ बीवाय ४००२) मुंबईकडे निघाले. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कार कऱ्हाड तालुक्यातील मालखडे फाटा येथे पोहोचली. त्यावेळी दुधाच्या टँकरला पाठीमागील डाव्या बाजूस कारची धडक बसली. त्यानंतर चालकाचा ताबा सुटून कार उपमार्गाच्या दिशेने जात बाभळीच्या झाडावर आदळली. ही धडक एवढी भीषण होती की, कारची चालकाकडील बाजू इंजिनसह काचेपर्यंत तुटली होती. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थ व प्रवाशांनी त्या ठिकाणी धाव घेतली. कऱ्हाड तालुका पोलिस ठाणे, महामार्ग पोलिस व महामार्ग देखभाल विभागाचे अधिकारी व कर्मचारीही तातडीने अपघातस्थळी धावले. त्यांनी कारमधील चारहीजणांना बाहेर काढून उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच प्रवीण व प्रिया यांचा मृत्यू झाला. तर प्रथमेश व पार्थ गंभीर जखमी आहेत. (प्रतिनिधी) अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार ४उंब्रज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार झाला. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ४घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर रविवारी सायंकाळी एका वृद्धाला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडकेत वृद्ध गंभीर जखमी झाला. मात्र, संबंधित वाहनासह चालकाने तेथून पलायन केले. अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच रुग्णवाहिकेलाही माहिती देण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचेपर्यंत संबंधित वृद्धाचा मृत्यू झाला. संबंधित वृद्धाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.