शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

देशाला शांतीची नव्हे क्रांतीची गरज

By admin | Updated: September 20, 2016 23:47 IST

मनोज कुमार : बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंशी साधला संवाद

सातारा : ‘आज देशात जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे. परिस्थिती बदलण्याची जबाबदारी भावी पिढीवर असून, त्यासाठी स्वत: तंदुरुस्त असले पाहिजे. देशाला शांततेची नव्हे तर, क्रांतीची गरज असून ही क्रांती घडवण्यासाठी युवा पिढीने खेळाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत,’ असे आवाहन अर्जुन पुरस्कार विजेते बॉक्सर मनोज कुमार यांनी केले. दरम्यान, आपणही एक मराठा असून, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर असल्याचेही यावेळी सांगितले. जिल्हा क्रीडा संकुलातील बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, मानद एनआयएस प्रशिक्षक सागर जगताप, अमर मोकाशी, विभागीय सचिव योगेश मुंदडा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॉक्सर जयसिंग पाटील यांच्यासमवेत मनोज कुमार यांनी सातारा क्रीडानगरीला भेट दिली. यावेळी सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे व विविध मान्यवरांनी त्यांचे साताऱ्यात स्वागत केले. जयसिंग पाटील यांनी मनोज कुमार यांचा परिचय दिला. मनोज कुमार म्हणाले, ‘सातारा बॉक्सिंग अ‍ॅकॅडमीने गेल्या वर्षभरात केलेली कामगिरी अलौकिक आहे. काहीतरी बनायचे आहे, करिअर करायचे आहे, यासाठी बॉक्सिंग खेळ चांगलाच आहे पण, काहीही करता नाही आले तरी आपले शरीर तंदुरुस्त बनवण्यासाठी बॉक्सिंग सारखा खेळ नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. आज देशाची परिस्थिती पाहिली की, शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एक दिशा दिली होती. त्यामुळे एक राष्ट्र निर्माण झाले होते.’ यावेळी त्यांनी खेळाडूंशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. सातारा बॉक्सिंग अ‍ॅकॅडमीच्या वतीने मनोज कुमार यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. मनोज कुमार यांच्या हस्ते शालेय हॉलीबॉल आणि बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजेंद्र हेंद्रे, डॉ. राहुल चव्हाण, दौलतराव भोसले, हरीष शेट्टी, रवींद्र होले, प्रा. संभाजी पाटील, प्रा. गुजर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी, क्रीडा शिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)