शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘काळी मैना’ विकून भागविला शिक्षणाचा खर्च !

By admin | Updated: June 18, 2015 00:45 IST

परळी खोरे : मे महिन्याच्या सुटीत करवंदे, जांभूळ विकून मुलांनी गिरवला ‘कमवा व शिका’चा धडा

परळी : शहरातील मुले शाळेला सुटी असली की मामाच्या गावाला जाऊन मौजमजा करीत सुटी आंनदात घालवतात; परंतु परळी, ठोसेघर, कास भागांतील मुलांना मात्र यंदाच्या सुटीत आनंदाला मुकावे लागले.ग्रामीण भागातील मुलांच्या फक्त आई-वडिलांच्या फाटक्या संसाराला मदत करणे, हेच त्यांच्या पाचवीला पुजलेले आहे. उन्हाळ्याच्या सुटीत अनेक मुलांनी डोंगरची काळी मैना विकून शिक्षणाचा खर्च स्वत: भागविला आहे. आई-वडिलांच्या संसाराला मुलांनी एकप्रकारे चांगला हातभार लावला आहे. तसेच पुढील शिक्षणासाठी लागणारा पैसाही या माध्यमातून त्यांनी जमा केला आहे. सातारा तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ व दुर्गम भाग आहे. यामध्ये परळी, ठोसेघर, कास परिसरातील अनेक गावे आहेत. परळी खोऱ्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी उरमोडी जलाशयात गेल्यामुळे शेतकरी हलाखीच्या परिस्थितीत जगत असतात. संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्यांना शहरी भागात नोकरी शोधावी लागते. याभागात पावसाचे प्रमाणही जास्त आहे. भात हे मुख्य पीक असल्याने हवामानाच्या अंदाजानुसार इतर पिकांचे उत्पन्न घ्यावे लागते. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये या परिसरातील मुला-मुलींनी करवंदे, जांभूळ, आळू यांचा व्यवसाय करून शैक्षणिक खर्च स्वत: भागविला.भल्या पहाटे दहा-बाराजणांचे ग्रुप करून मुले-मुली करवंदाच्या जाळ्यातून करवंदे तोडण्याचे काम होते. तसेच डोंगरातील जांभळाच्या झाडावर चढून जांभूळ काढली जात होती. सातारा शहरात किंवा ठोसेघर धबधबा, सज्जनगड, कास पठार आदी ठिकाणी पर्यटक भेट देत असल्याने तेथे मुलांना चांगले पैसे मिळाले. (वार्ताहर)पर्यटक होतात खूशठोसेघर, सज्जनगड येथे अनेक पर्यटक येत असतात. यामध्ये अनेक पर्यटक या मुलांबरोबर बोलत बसतात. यावर मुले आपण कशाप्रकारे रानमेवा आणतो, हे सांगतात. तर काहीजण मुलांवर ‘टायमिंग’ लावतात. मात्र, मुलांनी केलेल्या कष्टाची कहाणी ऐकताच पर्यटक खूश होऊन मुलांना जादा पैसे देतात. अवकाळी करवंदांना फटकाकरवंदे येण्याअगोदर अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने करवंदांना फटका बसला होता. अनेक ठिकाणी वणवे लावल्यानेही झाडे जळून गेली होती. त्यामुळे मुलांना करवंदे शोधण्यास जास्त त्रास झाला. मात्र करवंदाला जांभळापेक्षा जास्त मागणी बाजारपेठेत होती. त्यामुळे मुलांचेही यंदा नुकसान झाले आहे.