शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

संसाराची राख; सहा कुटुंबे उघड्यावर

By admin | Updated: July 10, 2015 22:06 IST

केर येथे अग्निकांड : १२ लाखांचे नुकसान; संसारोगपयोगी साहित्य खाक; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे वाचले २५ जीव

पाटण : पाटण शहरापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या केर गावातील यादव कुटुंबियांच्या १५ खणी घरास गुरूवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले.ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे घरातील लहान मोठी २५ लोकं आणि पाळीव जनावरे सहिसलामत वाचले. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत सहा कुटुंबातील भांडी, धान्य, कपडे, १५ हजार रोख रक्कम , सोन्या-चांदीचे दागिने, ७० पोती धान्य व इतर साहित्य भस्मसात झाले. पहाटे तीन वाजता आग आटोक्यात आणण्यास ग्रामस्थांना यश आले.केर, ता. पाटण येथील श्रीरंंग रामचंद्र यादव, परशराम रामचंद्र यादव, नंदकुमार रामचंद्र यादव, मनिषा शंकर यादव, सुनंदा मारूती यादव, निवृत्ती यादव अशी सहा कुटुंब प्रमुखांचे संसार एकाच १५ खणी घरात राहत होती. ९ जुलै रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने घरास आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. गावातील लोक झोपले होते. मात्र काही जण जागे होते त्यामुळे ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली.आरडाओरड झाल्यामुळे इतर गावकरी जमा झाले. पेट घेतलेल्या घरातील लोकांना बाहेर काढण्यात आले. पाळीव जनावरांचे दोर कापण्यात आले व त्यांची सूटका झाली. या घटेनेची माहिती मिळताच पाटण खरेदी विक्री संघाचा व कऱ्हाड नगरपरिषदेचा अग्निशामक बंब बोलाविण्यात आला. यानंतर ग्रामस्थांच्या साहय्याने आग आटोक्यात आणण्यास यश आले. गावकामगार तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)मोठा अनर्थ टळलाकेर येथील ग्रामस्थ मध्यरात्री गाढ झोपेत होते. घराला अचानक लागलेल्या आगीमुळे गावात नक्की काय झालं हे सुरुवातील कोणालाच समजल नाही. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या घरनजीक १० ते १२ घरे होती. ग्रामस्थांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे या सर्व घरांचा आगीपासून बचाव झाल्याने मोठा अनर्थ टळला.