शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याखालचा भ्रष्टाचार ‘रोडरोलर’मुळं उघडकीस

By admin | Updated: December 30, 2015 00:33 IST

साताऱ्यात थरार : भरावाखालच्या प्लॅस्टिक कचऱ्याचं अपघातानंतर दर्शन

सातारा : येथील ७५ मल्हार पेठ शॉपिंग सेंटर लगत असलेल्या रस्त्यावरून आठ टनाचा रोड रोलर गेला त्यामुळे रस्ता खचून रोलर इमारतीच्या तळमजल्यात घुसला. इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने भरावात टाकलेल्या कचऱ्यामुळेच रस्ता खचला असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत उलट-सुलट चर्चा नागरिक करीत होते.सातारा पोलीस मुख्यालयापासून प्रकाश लॉजकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरच नगरपालिकेची मल्हारपेठ शॉपिंग सेंटर इमारत आहे. या इमारती लगतच ठेकेदाराने भर टाकण्यासाठी फरशी तुकडे, प्लास्टिक पोती ने खड्डा भरला होता. त्यामुळे खड्यातील बहुतांशी भाग हा पोकळ राहिला होता. या रस्त्याचे काम सुरू असताना इमारतीच्या पायापासून डांबरीकरण करण्यासाठी सांगितले असता, याठिकाणी डांबर ,खडी टाकण्यात आली. रस्त्यावरती सपाटीकरण करून रोड रोलर चालक पुढे चालला असता या इमारतीलगतही सपाटीकरण करण्यासाठी नागरिकांनी चालकाला सांगितले. त्यावेळी येथे स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे चालकाने इमारतीच्या हद्दीतील रस्त्यावरील सपाटीकरणासाठी रोड रोलर आणला. मात्र, रोलरच्या वजनामुळे रस्ता क्षणातच खचला. आणि रोड रोलर इमारतीच्या संरक्षण भिंतीसह तळमजल्यात घुसला. या घडलेल्या प्रकारात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी ठेकेदाराने ही इमारत बांधताना गुणवत्तेत तडजोड केल्याचे जाणवले. हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला आहे. असे काही नागरिक उघडपणे बोलत होते. तर काही जण दबक्या आवाजात ‘ठेकेदाराची करतुद’ म्हणत होते. (प्रतिनिधी)भरावासाठी प्लास्टिक पोतेया इमारतीच्या लगत असणाऱ्या फूटपाथ वजा रस्त्यावर भर टाकण्यासाठी ठेकेदाराने मिळेल ती घाण टाकली आहे. यामध्ये फरश्यांची तुकडे उभी-आडवी टाकण्यात आले आहेत. तर सिमेंटचे पोते, कचरादेखील दिसत असल्याने ही भर पोकळ माती असून, रोड रोलरच्या वजनामुळे रस्ता खचल्याचे नागरिक बोलत आहेत.