पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. अपुऱ्या पाणी साठ्यावर पिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. मात्र महावितरणकडून अघोषित भारनियमनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापारी बांधावांमध्ये संतापाची भावना असून अधिकाऱ्यांनी आपल्या कारभारात सुधारणा करावी, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा सज्जड इशारा कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रुपाली जाधव यांनी दिला आहे.वाठार स्टेशन उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्वच गावांमध्ये सध्या भारनियमनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. अगोदरच पाणीसाठे अपुरे आहेत. थोडेफार असलेले पाणी शेतकरी पिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वारंवार वीज खंडीत होत असल्यामुळे पिकांना पाणी पाजणे शेतकऱ्यांना अवघड होत आहे. मुळातच कृषिपंपांना २४ तासांतून केवळ आठ तास वीज दिली जाते, मात्र तो पुरवठाही पूर्णवेळ होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढतच आहेत.पंपोडे बुद्रुक येथे वीज उपकेंद्र आहे. तेथून सोनके, पिंपोडे बुद्रुक, वाठारस्टेशन असे तीन फिडर करून वीज पुरवठा केला जातो. त्यातही घरगुती ग्राहक, व्यापारी, ग्राहकांबरोबर कृषी ग्राहक असे वेगवेगळे दोन विभाग करून भारनियमनाच्या वेळापत्रकाप्रमाणे वीज दिली जाते. काही गावांना आठवड्यातून चारवेळा दिवसा आणि तीन वेहा रात्रीची वीज कृषीपंपाना दिली जाते. दिवसा आणि रात्री शेतकरी विजेची वाट पाहत शेतात उभा असतो. मात्र विजेच्या लपंडावाने शेतकरी पुरता हैराण झाला आहे.परिसरातील शेतकऱ्यांबरोबर व्यापारी, ग्राहकांनी आपली कैफियत सभापती रुपाली जाधव यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना आपला कारभार लवकर सुधारा, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे खडसावले. (वार्ताहर)सद्यस्थितीत पंपाची वीज मागणी वाढली आहे. मात्र सातारारोड मधून मागणीपुरवठा नियंत्रीत होण्यात अडचणी येत आहेत. यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्याचबरोबर पिंपोडे बुद्रुक येथील उपकेंद्रामध्ये वाढीव ट्रान्सफार्मरला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात अशा अडचणी उद्भवणार नाहीत. शेतकऱ्यांबरोबर सर्वच ग्राहकांनी सहकार्य करावे.ए. वाय. साळवी, प्रभारी उप अभियंता, वाठार स्टेशन, उपविभाग, महावितरणविजेवर अवलंबून असणारे व्यवसाय अडचणीतपिंपोडे बुद्रुक येथील वीज उपकेंद्रातून दोन ट्रान्सफार्मवरून तीन नियं९झ केले जाते, मात्र मागणी पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त होत आहे. त्याठिकाणी आणखी एक ट्रान्सफार्मर असणे गरजेचे असूनही अधिकारी त्याबाबतीत प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येते. परिणामी शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी ग्राहकांची मोठी पंचायत झाली आहे. दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे छोटे-मोठे व्यावसायिक, पिठाची गिरणी व्यवसाय, फॅब्रिकेशन, झेरॉक्स, फोटो असे अनेक विजेची आवश्यकता असणारे व्यवसायही अडचणीत येत आहेत.
काम सुधारा अन्यथा परिणामांना सामोरे जा
By admin | Updated: December 11, 2014 23:52 IST