आदर्की : फलटण तालुक्यातील हिंगणगाव ग्रामपंचायतीमार्फत डॉक्टर, नर्स, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पोलीसपाटील, तलाठी, मंडल अधिकारी, शिपाई, पाणी पुरवठा शिपाई, मदतनीस, आरोग्य सेविका, वनपाल, कृषी सहायक, चालक, परिचारिका ग्रामसेविका यांचा कोराना काळात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल गौरव करण्यात आला.
सरपंच हेमा भोईटे, उपसरपंच शिवाजी भोईटे, जानोजीराव मालोजीराव भोईटे ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष पराग भोईटे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश भोईटे, माजी उपसरपंच जयदीप ढमाळ, डॉ. राहुल माने, मंडलाधिकारी विलास गायकवाड, वैभव भोईटे, महेश पंडित, दीपिका भोईटे, केशर काकडे, स्वाती पांडुळे, रत्नाबाई ठोंबरे, रोहिणी शिंदे, ग्रामसेवक ए .जे. गायकवाड, शिलवंत चव्हाण, बापूराव भोईटे, रमेश जाधव, वनपाल रूपाली भोईटे, सुप्रिया भोईटे, मनीषा बागडे, नितीन काटकर उपस्थित होते.
हे कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद शाळा, धनगरवाडा या ठिकाणी घेतले होते.