तसेच रेमडेसिविर उपलब्ध असूनही गरजूंना मिळाले नाही तर माहिती द्या, योग्य ती कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यांना वेळेत उपलब्ध होत नसलेले रेमडेसिविर इंजेक्शन याबाबत विश्व मराठा संघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन मनीषा पाटील यांची भेट घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला काही मदत लागणार असेल तर विश्व मराठा संघाची जिल्ह्यातील संपूर्ण टीम सहकार्य करण्यास तयार असल्याचे लेखी निवेदन देण्यात आले.
पाटील म्हणाल्या, कोरोनावर रेमडेसिविर हेच एकमेव औषध आहे असा अनेक लोकांचा गैरसमज झालेला आहे. रेमडेसिविरबरोबर अन्य औषधेही प्रभावी काम करतात. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी करण्याबाबत त्यांना समुपदेशनाची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी विश्व मराठा संघाच्या टीमने आम्हाला मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ड्रॅग इन्स्पेक्टर अरुण गोडसे, मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण पवार, युवक अध्यक्ष नागेश माने, महिला अध्यक्ष शीतलताई महांगरे, तसेच कऱ्हाड तालुका अध्यक्ष महादेव काशीद, कोरेगाव तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड, खटाव तालुका श्रीकांत कदम, माण तालुका रविदास जगदाळे, वाई तालुका विजया कांबळे, खंडाळा तालुका अशा कोंडाळकर आणि जावळी तालुका रंजीत घाडगे यांची उपस्थिती होती.
कोट
रेमडेसिविर इंजेक्शन सर्वसामान्यांना उपलब्ध होत नाही. धनदांडगे व पैसेवाल्यांना ते लगेच उपलब्ध होत आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार थांबवा व सर्वसामान्यांना न्याय द्या.
श्रीकृष्ण पवार
जिल्हाध्यक्ष मराठा संघ
फोटो आहे
सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देताना विश्व मराठा संघाचे जिल्हा पदाधिकारी.