शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खटाव, माण तालुक्यात ऑक्सिजनसह कोरोना सेंटर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:38 IST

वडूज : माण, खटाव तालुक्यातही कोरोनाचा कहर वाढत आहे. शासन, खासगी संस्थांकडून ऑक्सिजन बेड उपलब्ध केले आहेत. मात्र, ते ...

वडूज : माण, खटाव तालुक्यातही कोरोनाचा कहर वाढत आहे. शासन, खासगी संस्थांकडून ऑक्सिजन बेड उपलब्ध केले आहेत. मात्र, ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे माण, खटावमध्ये ड्रीम सोशल फाऊंडेशन आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ऑक्सिजन बेड उभारण्यात येत आहे,’ अशी माहिती निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, ‘ड्रीम सोशल फाऊंडेशनच्या प्रमुख अनुराधा देशमुख आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या प्रमुख रितू छाब्रिया यांच्या सहकार्याने सुसज्ज असे ऑक्सिजन बेड असलेले कोरोना सेंटर उभे करण्यात येत आहे. ​कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माण व खटावमध्ये भीषण स्वरूप धारण केलेले आहे. अनेक लोकांना उपचार करूनही प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये तरुणांनाही मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने खूप वेदना झाल्या आहेत. घरातील प्रमुख व्यक्तीच्या निधनाने काही कुटुंबांवर मोठा आघात झालेला आहे. आपण सर्वांनी त्या भीतीवर एकजुटीने मात करण्याची आवश्यकता आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत त्यांनी न घाबरता तत्काळ तपासणी करून घ्यावी. उपचार सुरू करावेत. लवकर व योग्य उपचार सुरू केल्यास कोरोनावर निश्चितपणे मात करता येते. गावागावांत प्रमुख व्यक्तींनी कोरोना संसर्ग तपासणीची मोहीम तीव्र करावी.’

‘बाधित रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच एचआरसीटी करावी. घाईगडबड करू नये. ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे त्या गावांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करून औषधोपचार सुरू करून देण्याबाबत ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी. आपण सर्वानी या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये लोकांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांना मदत करून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वानी एकमेकांना सहकार्याची भूमिका घ्यावी,’ असे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी केले आहे.