शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सेंटरमध्ये बाधित महिलांनी केले वडाचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वरकुटे-मलवडी : हिंदू धर्मातील महिलांसाठी ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वरकुटे-मलवडी : हिंदू धर्मातील महिलांसाठी ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संक्रमणाने वटपौर्णिमेलाही ग्रहण लागल्याने, ऐन वटपौर्णिमेच्या दरम्यान वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील कोरोनाबाधित झालेल्या महिलांनी उपचार घेत असलेल्या संकल्प कोरोना सेंटरमध्येच वडाच्या वृक्षाची मनोभावे पूजा केली. स्वतः जीवघेण्या रोगाशी लढा देत असतानाही आपल्या पतीसाठी वरदान मागितले.

ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेच्या सणाला वड या वृक्षाच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वड हा वृक्ष दीर्घायुष्य असणारा, डेरेदार सावलीचा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवासाचे व्रत करून मनोभावे वडाच्या झाडाची पूजा केल्यावर धन्याला जास्त आयुष्य मिळते, अशी धारणा या मागे आहे. यंदा मात्र कोरोनाची काळी छाया वटपौर्णिमेच्या सणावर पडल्याने, कोरोनाने बाधित झालेल्या सुवासिनी महिला वटपौर्णिमेच्या पवित्र व्रतापासून आणि वटवृक्षाच्या पूजेविना वंचित राहू नयेत, यासाठी संकल्प कोरोना सेंटरच्या निखिल बनसोडे, रंजीत चव्हाण, ललित केंगार, कुंडलिक मंडले या स्वयंसेवकांनी आपलेपणाचा आधार देत, आईच्या मायेच्या उबेने कोरोना सेंंटरच्या प्रांगणातच वटवृक्षाची मोठी फांदी लावून उपचार घेत असलेल्या सर्व सुहासिनी महिलांंसाठी वटवृक्षाच्या पूजेचे आयोजन करून आपलेपणाचा आधार दिल्याने सर्वच स्तरांतून स्वयंसेवकांचे कौतुक होत आहे.

चौकट :

कर्मचाऱ्यांच्या नियोजनाने भारावल्या

कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर उपचार घेणाऱ्या महिलांना आपण आजारी असल्याने, आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजाअर्चा करता येणार नाही, ही खंत त्यांच्या मनात राहू नये. सणाच्या निमित्ताने महिला रुग्णांचे समाधान व्हावे. यासाठी वटपौर्णिमा कोरोना सेंटरमध्येच साजरी करण्याचे नियोजन कर्मचाऱ्यांनी केल्याने सुवासिनी महिलांना खूप आनंद झाला.

फोटो २६वरकुटे-मलवडी

वरकुटेतील यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या संकल्प कोरोना सेंटरच्या प्रांगणात कोरोनाबाधित महिलांनी वटवृक्षाची पूजा केली.