शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोना" अन् "कृष्णा" निवडणूक ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:28 IST

गतवर्षी कोरोनाचे संकट अनपेक्षितपणे आले. सारा देश अनेक दिवस लाॅकडाऊन झाला. बाधितांची संख्या वाढत गेली; मृत्युदरही वाढला. साऱ्यांचे ...

गतवर्षी कोरोनाचे संकट अनपेक्षितपणे आले. सारा देश अनेक दिवस लाॅकडाऊन झाला. बाधितांची संख्या वाढत गेली; मृत्युदरही वाढला. साऱ्यांचे जणू कंबरडेच मोडले. या पहिल्या लाटेतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले आहे. पहिल्या लाटेपेक्षा ही दुसरी लाट भयंकर आहे. सातारा जिल्ह्यात तर त्याने थैमान घातले आहे. दररोज दोन हजारांवर नवे बाधित जिल्ह्यात सापडत आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासन हतबल दिसत आहे आणि म्हणूनच सध्या सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन सुरू आहे.

कोरोना संकटामुळे जिल्ह्यात एकाबाजूला कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. दुसरीकडे दि. २४ मे रोजी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. २५ पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या दोन गोष्टी भिन्न टोकाच्या आहेत. निवडणुकीसाठी गर्दी करणाऱ्यांना कायद्यामध्ये सवलत आहे का ? त्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही का ? या आणि अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे नक्की कोणाला मागायची? हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे. म्हणजे सामान्यांसाठी कडक निर्बंध अन् राजकारण्यांसाठी मोकळे रान अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

वास्तविक सहकार खात्याने सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने दि. ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्या त्या संस्थांच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदत वाढ दिली आहे. कृष्णा कारखान्याचाही त्यात समावेश होता. पण कृष्णा कारखान्याचे काही सभासद ही निवडणूक त्वरित घ्यावी म्हणून न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांच्या मताचा आदर करीत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे निर्देश संबंधितांना दिले. त्याचाच भाग म्हणून निवडणूक पूर्व प्रक्रिया सुरू झाली. कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली. हरकती, सुनावणी हे सोपस्कारही पूर्ण झाले. पण दरम्यानच्या काळात सातारा जिल्ह्यात किंवा राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण भलतेच वाढले आहे. अशा भयंकर परिस्थिती कृष्णा कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली जाईल, अशी शक्यता सभासदांना वाटत होती. पण तोवर निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर झाल्याने सभासदांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

न्यायालयाने निर्देश दिल्याने ही निवडणूक प्रक्रिया होत असल्याचे प्रशासकीय उत्तर आज दिले जाते, पण जेव्हा निर्देश दिले तेव्हाची परिस्थिती व सध्याची कोरोनाची परिस्थिती यात खूप मोठा फरक आहे. हा फरक, परिस्थितीचे गांभीर्य संबंधितांना पटवून देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? ते काम प्रशासकीय उत्तर देणाऱ्या प्रशासनाचेच नाही का? पण त्यांनी ते काम व्यवस्थित न केल्यानेच आज ही निवडणूक लादली गेली आहे असेच म्हणावे लागेल.

नुकत्याच पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या, राज्यातही पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक झाली. तेथे प्रचाराचा धुरळा उडालेला पाहिला मिळाला. निवडणुकीच्या निकालानंतर गुलालाची उधळण झालेली पाहिली, पण त्याचे वाईट परिणाम काही दिवसांनी समोर आले त्याचा विचार कोण करणार? जेथे निवडणुका झाल्या तेथे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समोर आले आहे. अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. यातून प्रशासनाने नेमका काय बोध घेतला म्हणून सातारा जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांचा आलेख चढता असताना व कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासनाने हा निवडणूक कार्यक्रम कसा जाहीर केला हे समजायला मार्ग नाही.

सातारा सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृष्णा साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. सुमारे ४७ हजार ऊस उत्पादक या कारखान्याचे सभासद आहेत. होऊ घातलेल्या निवडणुकीत हे सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कृष्णेच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीचे स्वरूप प्राप्त होते हा आजवरचा अनुभव आहे. कोरोनाच्या अशा परिस्थितीत होत असलेली ही निवडणूक लोकांच्या जिवावर बेतू नये हीच अपेक्षा.

प्रमोद सुकरे

कराड