शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

क्रांतीच्या जिल्ह्यात सहकार धोक्यात !

By admin | Updated: December 5, 2014 23:27 IST

अनेक गैरव्यवहार : भ्रष्टाचार कळीचा मुद्दा; सूत्रधारांचा शोध महत्त्वाचा

संजय कदम - वाठार स्टेशन -सहकाराची क्रांती झालेल्या सातारा जिल्ह्यातला सहकार आज खासगीकरणाच्या वाटेवर आहे. सहकार जोपासला तरचं शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल. जिल्हा बँकेच्या अधिपत्याखालील विकास सेवा सोसायट्यांमधील भ्रष्टाचार हाच आज कळीचा मुद्दा ठरला असून जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात करोडोंचा गैरव्यवहार झाला. या सोसायट्या आता धोक्यात आल्या आहेत. या गैरव्यवहारामागे नक्की कोण ? याचा शोध घेणं गरजेचं आहे.ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाने हलगर्जीपणा केला तर त्याची शिक्षा सरपंचांना भोगावी लागते. सोसायटीत सचिवाने गैरव्यवहार केला तर त्याची शिक्षा संचालक मंडळ, चेअरमनला भोगावी लागते. मग जिल्हा बँकेचे विकास अधिकारी दोषी असले तर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ दोषी का ठरूव नये ? हा नियम सर्वांसाठीच सारखा असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.देऊर-दहिगाव विकास सेवा सोसायटीत दुबार कर्जाचा आकडा ५५ लाखांच्या घरात आहे. दुबार कर्ज म्हणजे पहिले घेतलेले कर्ज परतफेड केल्यानंतर दुसऱ्यांदा कर्ज पुरवठा करणे याची सर्व जबाबदारी जिल्हा बँकेच्या विकास अधिकाऱ्यांची असते. देऊर, दहिगाव सेवा सोसायटीमध्ये पहिली कर्ज फेड केली नसताना दुसरी कर्जे कशी देण्यात आली. याशिवाय कर्ज देताना त्या शेतकऱ्याला कमाल मर्यादा ठरवून दिलेली असते. मात्रे हे सर्वच नियम या सोसायटीत ढाब्यावरचं बसवले आहेत.सचिवाने या सोसायटीत शेतकऱ्यांच्या विश्वास घात करीत अनेकांच्या खोट्या सह्या करून परस्पर व्यवहार फिरवले आहेत. तर बँकेच्या स्लिपवरही शेतकऱ्यांकडून सह्या घेतल्याने आता शेतकरीही अडचणीत आले आहेत. सहकार क्षेत्रात लागलेल्या या गालबोटामुळे भविष्यात सहकारी सेवा सोसायट्यांचे अस्तित्वचं धोक्यात येणार आहे. सचिव, लेखा परीक्षक, विकास अधिकारी यांच्या गलथानपणाची शिक्षाच संचालक मंडळाला भोगावी लागत आहे. भविष्यात सहकारी संस्थेच्या निवडणुकात सोसायट्यांचे सदसत्व सुध्दा नको अशीच धास्ती आता शेतकरी व्यक्त करीत आहेत.दोषींना कठोर शिक्षाच व्हावी...चोर सोडून संन्याशालाच फाशी होत असल्याने सहकारी संस्थांच्या बाबतीत कुठेतरी जागृत भूमिका घ्यावी. जे खरेच दोषी आहेत. त्या सर्वांनाच कठोर शासन झाले तरच या सोसायट्यांचे अस्तित्व भविष्यात राहील, असे सांगण्यात येत आहे.