शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘पेटी मेंबर’वर संक्रांत; पक्षाला तिळगूळ वाटा

By admin | Updated: January 13, 2017 22:30 IST

‘सांगलीचा प्रसाद’ म्हणे पक्ष निधीला : शरद पवारांनी सांगितलेल्या किश्श्यातून झेडपी सदस्यांना जणू सांकेतिक इशारा

सातारा : शेंद्रेच्या कार्यक्रमात खासदार शरद पवार यांनी एक किस्सा सांगितला. झेडपीची उमेदवारी मागण्यासाठी बारामतीच्या बंगल्यात गेलेल्या साताऱ्याच्या एका मेंबरला त्यांनी ‘सांगलीकरांकडून मिळालेला प्रसाद अगोदर पक्षाला निधी म्हणून द्या, मग तिकिटाचं बघू,’ असं सांगितलं. हा किस्सा रंगवून सांगण्यामागचा अर्थ जिल्ह्यातील मेंबर मंडळींनी ओळखला असून, ‘तिकडून घेतलेला प्रसाद आता इकडं पक्षाला द्यावा लागणार,’ याची खूणगाठही अनेकांनी बांधली आहे म्हणे. त्यामुळं या ‘पेटी मेंबर’ मंडळींवर जणू संक्रांत ओढावली असून, एकट्याने खाल्लेला ‘प्रसाद’ आता तिळगुळासारखा वाटावा लागणार आहे म्हणे.सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातून गेल्यामुळे मनात भळभळणारी जखम घेऊनच शरद पवार साताऱ्यात आले होते. सांगलीतून ज्यांनी ‘लक्ष्मीचा प्रसाद’ घेतला, त्यांची यादीच आपल्याजवळ असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी अजिंक्यतारा कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात केला. पतंगरावांकडूनच नव्हे तर शेखर गोरेंकडूनही प्रसाद घेतलेल्यांनी पहिल्यांदा तो राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे पोचवावा, त्यानंतरच तिकीट मागायला यावे, अशी कोपरखळीही पवारांनी शेलक्या भाषेत लगावली.राष्ट्रवादीचा सातारा हा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यातच विधान परिषद निवडणुकीत मते फुटल्याने शरद पवार चिंतेत पडले होते. ही चिंता त्यांनी मेळाव्यात व्यक्त केली. केंद्र व राज्यातील सत्ता गेल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत लागणाऱ्या निधीची चिंताही यानिमित्ताने पक्षाला भेडसावत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर आले. ५० वर्षांच्यापेक्षा जास्त काळ राजकारणात घालविणाऱ्या या नेत्याने अनेकांची कुंडली आपल्याकडे असल्याचे यावेळी स्पष्ट केले. तसेच सांगलीचे नेते अन् आपण एकाच शिक्षण संस्थेत संचालक असल्याने गप्पांच्या ओघात मागील गुपिते समोर येतात, हेही त्यांनी सांगून टाकले. कुणी चिमूटभर, कुणी चमचाभर तर कुणी वाटीभर प्रसाद घेतला. त्यांनी आता गपचूपपणे पक्षाकडे जमा करण्याचा आदेशही पवारांनी काढला.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व करायचे आणि ऐन युद्धाच्यावेळी विरोधकांशी तह करायचा, असा प्रकार इथून पुढे खपवून घेतला जाणार नाही, हेही स्पष्ट झाले. सकाळ-संध्याकाळ अशा प्रसादाला जे हपापले आहेत, असे कार्यकर्ते सोबत नसतील तरी चालेल, असेही निक्षून सांगितले. समोरच्या गर्दीचा अंदाज घेऊन काय बोलायचे, हे खा. शरद पवार यांच्याइतके कोण जाणत असेल? पवारांनी अजिंक्यताऱ्यावरील सभेत जमलेल्या कार्यकर्त्यांना आपल्या ओघवत्या भाषेत जिंकले. मोदींच्या निर्णयामुळे कृषी अर्थव्यवस्था अडचणीत येऊन शेती मालाला दर मिळत असल्याचे सांगताना पवारांनी साताऱ्याची हळद अन् नागठाण्याचे आले,’ असा उल्लेख केला. या मेळाव्याला नागठाणे परिसरातीलच शेतकरी मोठ्या संख्येने असणार, हे लक्षात घेऊन पवारांनी नागठाण्याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची वात सुलगावून पवार बारामतीकडे परतले आहेत. पवारांच्या कोपरखळ्यांमधून प्रत्येक कार्यकर्त्याने वेगळा-वेगळा अर्थ काढला असणार, हे निश्चित. पण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच वातावरणनिर्मिती झाली. (प्रतिनिधी)पवारांना तिकीट मागायला गेलेला कोण?‘एक गडी माझ्याकडे तिकीट मागायला आला होता. सांगलीची जी यादी माझ्याकडे होती, त्यात या गड्याचं नाव होतं. तुला प्रसाद पोचला होता का? असं विचारताच तो गडबडला, थरथर कापायला लागला,’ असं पवारांनी चपखल भाषेत स्पष्ट केलं. दरम्यान, जिल्हा परिषदेचं तिकीट पवारांकडे मागायला गेलेला हा महाभाग कोण? याचीच चर्चा जिल्हाभर सुरू आहे. पवारांना तिकीट मागायला गेलेला कोण?‘एक गडी माझ्याकडे तिकीट मागायला आला होता. सांगलीची जी यादी माझ्याकडे होती, त्यात या गड्याचं नाव होतं. तुला प्रसाद पोचला होता का? असं विचारताच तो गडबडला, थरथर कापायला लागला,’ असं पवारांनी चपखल भाषेत स्पष्ट केलं. दरम्यान, जिल्हा परिषदेचं तिकीट पवारांकडे मागायला गेलेला हा महाभाग कोण? याचीच चर्चा जिल्हाभर सुरू आहे.