शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वाई तालुक्यात गावपातळीवर सोयीच्या आघाड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

वाई : राज्यात तीन पक्षांचे सरकार विरुद्ध भाजप असे समीकरण असून, राज्य पातळीवरील नेते सर्व निवडणुकांमध्ये आघाडीचे घटक पक्ष ...

वाई : राज्यात तीन पक्षांचे सरकार विरुद्ध भाजप असे समीकरण असून, राज्य पातळीवरील नेते सर्व निवडणुकांमध्ये आघाडीचे घटक पक्ष एकत्र लढणार, असे म्हणत असले, तरी ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून समीकरणे बदलताना दिसत आहेत. गावापातळीवर मुख्य प्रबळ असलेल्या पक्षाच्या विरोधात बाकीचे पक्ष एकत्र येऊन लढताना दिसत आहेत. यामध्ये राज्य पातळीवरील आघाडीला तिलांजली दिल्याचे चित्र दिसत आहे.

वाई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या २४२ वॉर्डमधील ६०६ जागांसाठी एकूण १ हजार १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत १२ ग्रामपंचायतींतील १८ अर्ज बाद झाले होते. तालुक्यातील १९ पूर्णतः बिनविरोध झाल्या असून, ५७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली आहे. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्येही काही गावांमध्ये काही वाॅर्ड बिनविरोध झाले आहेत. तालुक्यात अनवडी, उलुंब, वेलंग, बोपेगाव, दसवडी, कनूर, कोंढवली, वयगाव, जांब, जोर, किरुंडे, परतवडी, वाशिवली, शेलारवाडी, वेरुळी, वासोळे, मुंगसेवाडी, खावली आणि अनपटवाडी आदी गावे बिनविरोध झाली असून, उरलेल्या ५७ ग्रामपंचायतींमध्ये मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे.

निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कोठेही वापरताना दिसून येत नाही. बावधन हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानले जात असले, तरीही बावधनमध्ये भाजप-शिवसेनेमध्ये युती झाली असून, राष्ट्रवादी विरोधात शिवसेना-भाजप लढत असून, काँग्रेस पक्ष तटस्थ भूमिकेत आहे, तर परखंदीत राष्ट्रवादीची भाजपसोबत युती झाली असून, काँग्रेसला खिंडीत पकडण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे. परंतु काँग्रेसचे विराज शिंदे यांचे पारडे जड आहे. केंजळमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत आहे. पसरणीत राष्ट्रवादीत दोन गट पडले असून, एका गटाने भाजपबरोबर युती केली असून, आरपीआयने एका वाॅर्डात बंडखोरी करून तीन उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले आहेत. चिखलीमध्ये विकास शिंदेंच्या काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी व शिवसेनेची युती झाली असून, चिखलीतील तीन वाॅर्डपैकी दोन वाॅर्ड बिनविरोध झाले आहेत. एका वाॅर्डमध्ये निवडणूक लागलेली आहे. मेणवली ग्रामपंचायतीत काँग्रेसने जुळवून घ्यावयाचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे मेणवली ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेस अशी सरळ लढत आहे.

चौकट..

राष्ट्रवादीचे पारडे जड... भाजपची कडवी झुंज, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई

इतर गावांतील ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युल्याला तिलांजली देत स्थानिक आघाड्या करीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. उर्वरित ५७ ग्रामपंचायती निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. आमदार मकरंद पाटील यांचे तालुक्यातील निवडणुकीवर बारीक लक्ष असून, आजमितीला वाई तालुक्यात राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. भाजपने राष्ट्रवादीशी कडवी लढत दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे.