शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही पालखी तळांवर नियंत्रण कक्ष

By admin | Updated: July 5, 2016 00:32 IST

प्रमोद यादव : फलटण येथील आढावा बैठकीत सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन

फलटण : ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याच्या फलटण तालुक्यातील वास्तव्या दरम्यान दि. ६ ते ८ जुलै दरम्यान सोहळ्यासमवेत येणारे दिंडीकरी, वारकरी, भाविक यांच्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे सर्व नागरी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे योग्य नियोजन करावे आणि पालखी सोहळा यशस्वी करावा,’ असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी केले. येथील तहसील कार्यालयात पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सोनवणे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अधिकराव पाटील, निवासी नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे आदी उपस्थित होते. ‘महसूल खात्याच्या वतीने तालुक्यातील तरडगाव, फलटण व बरड या तीनही पालखी तळांवर नियंत्रण कक्ष राहणार असून, तेथे महसूल खात्याच्या विशेष पथकाद्वारे सर्व शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून तसेच सोहळा प्रमुख व देवस्थानचे विश्वस्त यांच्याशी संपर्कात राहून सर्व नियोजनाचे नियंत्रण व योग्य व्यवस्था राखण्यासाठी कार्यरत राहील, त्याचबरोबर तहसील कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून, तेथूनही सर्व व्यवस्थेचे नियोजन व आवश्यक ती मदत पोहोचविण्याचे काम करण्यात येणार आहे,’ असे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले. महसूल खात्यांतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमातून सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी भाविकांना रॉकेल व गॅस इंधन स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी तरडगाव येथे ५, विठ्ठलवाडी येथे १ फलटण पालखी तळावर (विमानतळ) ५, मार्केट यार्ड येथे १ (नांदले दुकान), बरड येथे २ याप्रमाणे रॉकेल उपलब्ध करून देण्यात येणार असून, स्वयंपाकाच्या गॅस वितरणासाठी तरडगाव येथे ३, फलटण येथे २, बरड येथे २ विशेष केंद्र कार्यरत राहणार असून, या सर्व केंद्रांसाठी पुरेशा प्रमाणात रॉकेल व स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तरडगाव व बरड येथील पालखी तळाकडे जाणारे रस्ते व्यवस्थीत ठेवण्यात येत असून, पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासून घेण्यात आले आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून पालखी मार्गावर १० ठिकाणी टँकर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधावारकरी, दिंडीकरी, भाविकांना पुरेशी वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १० वैद्यकीय अधिकारी व ३० कर्मचारी, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्वप्रकारचा पुरेसा औषध साठा उपलब्ध केला जाणार आहे. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोहळ्यातील वैद्यकीय सेवा सुविधांसाठी ३७ वैद्यकीय अधिकारी, १३८ कर्मचारी, ५ वाहनांसह विशेष पथके, उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सोहळ्या समवेत २ वैद्यकीय पथके व १०८ क्रमांकाच्या २ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. व्ही. व्ही. पोटे यांनी सांगितले.