शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कर्जाची माहिती घेण्याचे काम सुरू

By admin | Updated: March 23, 2015 00:41 IST

जावळी तालुका : दु:खात बुडालेल्या कुटुंबीयाचे तहसीलदारांकडून सांत्वन

कुडाळ : राणगेघर, ता. जावळी येथील शेतकरी दिलीप आनंदराव करंदकर (वय ४३) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार रणजित देसाई यांनी करंदकर यांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन सांत्वन केले.याबाबत माहिती अशी की, राणगेघर येथील दिलीप करंदकर यांची स्वत:ची चार एकर शेती आहे. त्यांनी शेतीघरासाठी सोसायटीतून तीन एकर, २५ हजार कर्ज व पीककर्ज ४० हजार घेतले होते. डोक्यावर कर्जाचा बोजा झाल्यामुळे पैशांच्या विवंचनेतून त्यांना मार्चअखेरचा धसका समोर दिसत होता. या विवंचनेतून ते १६ मार्च रोजी ‘पैसे आणायला जातो,’ असे सांगून ते घरातून बाहेर गेले होते. चार दिवसांनंतरही ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी करहर पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या कोठारे या भातशेतीच्या शिवारात ओढ्याच्या काठी असलेल्या जांभळाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. करहर पोलीस दूरक्षेत्रात नोंद झाली असून, सहायक फौजदार एम. आर. शेडगे तपास करत आहेत. (प्रतिनिधी)आम आदमी योजनेचा लाभ देण्यासाठी पुढाकारघटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार रणजित देसाई यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. संजय गांधी आम आदमी योजनेचा लाभ करंदकर कुटुंबीयांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, करंदकर यांच्या कर्जाची माहिती महसूल विभाग घेत आहे.