शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कास-बामणोलीत भलरी दादा भलरीच्या संगतीत भात लागवण

By admin | Updated: July 10, 2017 14:27 IST

शेतकऱ्याची लगबग : डोक्यावर इरले, पोती अन कागदाची टापूस बांधून लावणीला वेग

आॅनलाईन लोकमतपेट्री (जि. सातारा), दि. १0 : पश्चिम घाटात गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कास, बामणोली परिसरातील शेतकरी भात लावणीत मग्न आहेत. डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात मग्न झाले आहेत. तसेच भात लावणीसाठी बैलांच्या सहाय्याने चिखलणी करण्याचे कामही सुरू असल्याचे दिसून येत आहे.कास-बामणोली परिसर हा घाटमाथा म्हणून ओळखला जातो. हा भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. लाल माती, मुरबाड जमीन असल्याने येथील शेतकरी भात, नाचणी, वरी ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. या भागातील जमिनी निकृष्ट, तीव्र डोंगर उतार व लाल मातीच्या असल्यामुळे चांगली पिके येण्यासाठी खूप मशागत करावी लागते. येथील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात ऐन, उंबर, जांभुळ अशा झाडांच्या फाद्यांची कवळे बांधली होती.होळीनंतर तयार केलेल्या तरव्यांची भाजणी केली गेली. मान्सूनपूर्व पावसाळ्याला सुरूवात होताच जून महिन्यात या तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची रोपे तयार करण्यासाठीची पेरणी करण्यात आली होती.भात लावणीसाठी तयार केलेली रोपे साधारणत: २१ ते ३० दिवसांपर्यंत योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औताच्या साह्याने चिखलणी तयार करून या चिखलणीत तरव्यातील भाताच्या रोपांची लावणी करण्यात येत आहे.

गाण्यांची साथ...

डोक्यावर इरलीचा आधार घेऊन, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भाताची लावणी करत आहेत. भात लावणी करत असताना करमणुकीसाठी तसेच कामात कंटाळा येऊ नये म्हणून शेतकरी गिते म्हणताना दिसत आहेत.भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता लागत असते. लावणी करताना एकमेकांना मदत करण्यात येते. यालाच या परिसरात पैरा असे म्हटले जाते.- ज्ञानेश्वर आखाडे, शेतकरी, कुसुंबीमुरा