शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात प्रथमच दोन वन उद्यानांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:13 IST

खंडाळा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे..’ संतांच्या या उक्तीप्रमाणे भावी पिढीला सुरक्षित आणि संपन्न वृक्ष प्रजातींचा ठेवा देण्यासाठी राज्य सरकारच्या वन खात्याने उपवनांची निर्मिती करून वन उद्याने उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील गुरेघर या दोन ठिकाणी वन उद्यानांची निर्मिती केली जाणार ...

खंडाळा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे..’ संतांच्या या उक्तीप्रमाणे भावी पिढीला सुरक्षित आणि संपन्न वृक्ष प्रजातींचा ठेवा देण्यासाठी राज्य सरकारच्या वन खात्याने उपवनांची निर्मिती करून वन उद्याने उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील गुरेघर या दोन ठिकाणी वन उद्यानांची निर्मिती केली जाणार असल्याने हा परिसर आता नंदनवन बनणार आहे.राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणी या पद्धतीने ३४ जिल्ह्यांत ६८ वन उद्यानांची निर्मिती वनविभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या वनांना ‘दिवंगत उत्तमराव पाटील वन उद्यान’ या नावाने संबोधले जाणार आहे. राज्यातील या उपवनांमधून फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदन वृक्षवन, चरक वन, लतावन, सारिकावन, मगृसंचार वन, अतितिवन यासारखी विविध प्रकारची वने साकारली जात आहेत. यामध्ये प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून उद्यानांमधून स्मृतिवने निर्माण केली जात आहेत. निरनिराळ्या वृक्ष प्रजातींचे समूह निर्माण करण्याबरोबरच दुर्मीळ, औषधी आणि सुंदर वृक्ष प्रजातींचे जतन आणि संवर्धन होणार आहे. शहरांमधील नागरिकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष प्रजाती व वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे, यासाठी या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा, व्यायाम आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.आता वन्यजीवांचा अभ्यास सोयीचा..सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील गुरेघर या दोन ठिकाणी अशा वन उद्यानांची निर्मिती होणार असल्याने आता विविध वृक्ष प्रजाती व वन्यजीवांचा अभ्यास करणे सोयीचे होणार आहे.संग्रहालय साकारणारया वन उद्यानांमध्ये वृक्ष-लतांचे महत्त्व आणि उपयोगिता यांची माहिती मिळावी, यासाठी पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे नियोजित आहे.