शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यांची निर्मिती.. .. ओढ्यांना काळ !

By admin | Updated: April 8, 2016 23:55 IST

फलटण पश्चिम तालुका : जलस्त्रोत आटल्याने पाण्यासाठी वणवण--पाणी अखेर पळविले कुठे?

सूर्यकांत निंबाळकर-- आदर्की --तालुक्याच्या पश्चिम भागातील सालपे ते बीबी गावापर्यंत धोम-बलकवडीचा उजवा कालवा डोंगर पायथा भागातून गेला आहे. हा कालवा दुष्काळी भागाला जरी वरदान ठरला असला तरी कालव्याच्या वरून वाहणारे ओढे कोरडे पडले आहेत. पावसात वाहत जाणारे पाणी ओढ्यांऐवजी कालव्यात जात आहे. परिणामी पश्चिमेकडील हिंगणगावसह अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.हिंगणगाव महसुली विभागातील आदर्की रेल्वेस्टेशन परिसरात ब्रिटिशकाळात रेल्वेलाईन तयार करण्यासाठी बोगद्याचे काम सुरूअसताना पाणीसाठा सापडला. रेल्वे प्रशासन व ठेकेदार यांनी डिझेल इंजिनद्वारे जलस्त्रोत बंद करण्याचा प्रयत्न केला. यात अपयश आल्याने अखेर लोखंड व सिमेंट टाकून जलस्त्रोत मुजविण्यात आला. यानंतर त्याठिकाणी रेल्वेलाईनचे काम करण्यात आले. रेल्वेलाईन खालून तीस मीटर खोल खोदकाम करून १२०० मीटरचा बोगदा तयार करण्यात आला. त्यावेळी २० अश्वशक्ती विद्युत मोटाराएवढे पाणी बोगद्यात पडत होते. नैसर्गिक पाण्यामुळे बोगद्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही अद्याप अपूर्ण आहे. हिंगणगावजवळील धनगरवाडा ओढ्यावर तीन पाझर तलाव असून, हे तिन्ही तलाव कोरडे पडत नाहीत. यावर्षी हे ओढे कोरडे पडले पाझर तलावांसह हिंगणगाव परिसरातील विहिरीही आटल्या आहेत. धनगरवाडा येथील पाणीपुरवठा करणारी विहीरही कोरडी पडल्यामुळे हिंगणगाव ग्रामपंचायतीमार्फत विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आठवड्यातून दोनदाच पाणी मिळत आहे. नवीन विहिरीचे खोदकामग्रामपंचायतीने बुरखुंडी धरणाजवळ दुसरी विहीर खोदून पाच हजार फूट पाईपलाईन टाकून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे काम सुरू केले आहे. हिंगणगावच्या ओढ्याचे पाणी कालव्यात गेल्याने ओढा कोरडा पडला असून, त्यामुळे या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.