शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाटण तालुक्यात तीन हजार घरकुलांची उभारणी...

By admin | Updated: April 29, 2017 13:09 IST

२४१ गावांत कामे ; पाणी अन् साहित्य नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा

अरुण पवार/  लोकमत आॅनलाईन पाटण (जि. सातारा) , दि. २९ : जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच घर बांधायचे असेल तर त्याचे साहित्य डोक्यावर घेऊन पोहचवावे लागते. अशा दुर्गम पाटण तालुक्यात गेल्या काही महिन्यांत तब्बल ३०० घरकुले शासकीय अनुदानातून उभी राहिली आहेत. अशाप्रकारे तालुक्यातील २४१ गावांमध्ये घरकुलांची कामे झाली आहेत. अनेक वर्षांपूवीर्पासून शासन घरकुल योजना राबवत आले आहे. त्यासाठी अनुदान दिले जात होते. मात्र काही अटी लादल्या जात होत्या. आता मात्र तसे नाही. प्रत्येकी लाभार्थ्यास १ लाख ४९ हजार रुपये अनुदान घर बांधणीसाठी दिले जाते. त्यामध्ये स्वत:चे कितीही पैसे घालून आणि पाहिजे तितक्या जागेत ऐसपैस घर बांधता येते. पाटण पंचायत समितीच्या गटविकास आधिकाऱ्यांनी तालुक्यात स्वतंत्र अंभियत्यांची निवड करून घरकुल योजनेतील घर बांधणीसाठी प्रत्यक्षात देखरेख करून मार्गदर्शन केले. पाटण तालुका दुर्गम डोंगराळ असल्याने अनंत अडचणीना सामोरे जावे लागले. काही लाभार्थी अंपग, अंध तर काहींना कुणीही नातेवाईक नसल्याने घर बांधणीच्या कामात कुणाचीही मदत मिळेना असे अनुभव गटविकास अधिकारी गौतम आणि अभियंता जगदीश पाटणकर यांना आले. तरीसुधदा अशावर मात करून दारिद्र रेषेखालील लोकांना त्यांच्या स्वपनातील घरे आणि तीही भव्य व लाईफटाईमसाठी उभी करण्याचे यशस्वी प्रयत्न पाटण तालुक्यात झाले आहेत. दुर्गम तालुक्यात रोल मॉडेल घरकुलपाटण तालुका दुर्गम, डोंगराळ आहे. अशा परिसरात घरे बांधायची झाल्यास नाकीनऊ येत आहे. अशा परिस्थितीत सुध्दा पाटण पंचायत समिती प्रशासनाने गावांगावांत जाऊन लाभार्थींना घरे बांधण्यासाठी प्रसेत्साहत दिले. अडीअडचणीवर मात करून घरकुले बांधायचीच यासाठी बिडीओंनी वारंवार लाभाथी, ग्रामसेवक, इंजिनिअर यांचा बैठका घेऊन आढावा घेतला. त्यामुळेच आज तालुक्याच्या कोयना परिसरात सुध्दा प्रशस्त घरकुले उभी राहिली आहेत. तालुक्यातील ही घरे रोल मॉडेल ठरणार आहेत. पाटण तालुक्यात सुमारे ३ हजार नव्या घरकुलांची उभारणी करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. संबंधीत लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम तातडीने देण्यासाठी आमची यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. मी स्वत: जागेवर जाऊन घरकुल बांधकामाची पाहणी केली. निराधार महिला आणि पुरुषांना घरकुल बांधण्यासाठी आलेल्या अडचणीतून मार्ग काढला आहे. - के. एस. गौतम,गटविकास आधिकारी