शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंना जखडवून ठेवण्यासाठीच षडयंत्र...

By admin | Updated: March 24, 2017 00:17 IST

‘साविआ’चा आरोप : खंडणीच्या गुन्ह्याशी काडीचाही संबंध नाही

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अन्य व्यक्तींवर दाखल झालेला खंडणीचा गुन्हा हे एक राजकीय षडयंत्र आहे. वास्तविक सोना अलायन्स कंपनी मालकाला झालेल्या मारहाणीचा आणि उदयनराजे यांचा काडीचाही संबंध नाही. जखडवून ठेवण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे राजकीय षडयंत्र आहे,’ असा आरोप सातारा विकास आघाडीचे नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, माजी नगरसेवक संजय शिंदे यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दि. १८ रोजी झालेल्या मारहाणीची दि. २३ रोजी तक्रार दाखल होते. यावरूनच अशी तक्रार देणे हे एक राजकीय षडयंत्रच असल्याचे स्पष्ट होत आहे. मारहाण झाल्यावर त्याच दिवशी किंवा उशिरात उशिरा दुसऱ्या दिवशी तक्रार दाखल झाली असती तर आपण समजू शकलो असतो; परंतु सोना अलायन्स कंपनीचा कामगारांचा सुरू असलेला संप, त्या विरोधात कामगारांवर कंपनीच्या माध्यमातून चालवलेली दडपशाही आणि हे सर्व करूनसुद्धा कामगार संपावरून हटत नाहीत, असे दिसून आल्यावर या कंपनीत कार्यरत असलेल्या शिवप्रताप माथाडी कामगार युनियनच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होणे. यासर्व बाबी शंकास्पद असून, खासदारांची राजकीय आणि व्यक्तिगत बदनामी करण्यासाठी आणि त्यांचा उत्कर्ष सहन होत नसललेल्या लोकांचे हे एक राजकीय षडयंत्र आहे. (प्रतिनिधी)