शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘आरएसएस’च्या सेवाकार्याला बदनाम करण्याचे षड‌्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:39 IST

कऱ्हाड : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोरोनाकाळातील सेवाकार्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली होती. या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत असताना, ...

कऱ्हाड : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोरोनाकाळातील सेवाकार्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली होती. या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत असताना, संघाच्या सेवाकार्याला गालबोट लावण्याचे षड‌्यंत्र काही समाजकंटकांनी केले आहे, असा आरोप संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत एकांडे व जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह संदीप कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आपल्या देशातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर प्रशासनाच्या मदतीसाठी केवळ सेवाकार्याच्या भावनेने संघ स्वयंसेवक पुढे आले आहेत. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णालय प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन शुक्रवार (दि. ७) पासून लसीकरण केंद्रावर संघ स्वयंसेवक रुग्णालय प्रशासनाला मदत करीत आहेत. यामध्ये लसीकरण केंद्र साहाय्यता कक्ष, नावनोंदणी, ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य, गर्दी नियंत्रण यांमध्ये संघ स्वयंसेवक जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत करीत आहेत.

यासाठी आवश्यक ती पूर्वपरवानगी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांच्याकडून घेऊनच संघ स्वयंसेवक केंद्रामध्ये सेवा देत होते. त्यामुळे केंद्रावर कार्यरत कर्मचारी व रुग्णालय प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच स्वयंसेवकांमुळे नागरिकांच्या शंकांचे समाधान योग्य पद्धतीने होत आहे. वेळ वाचत असल्याने अनेकांनी या कार्याचे कौतुकही केले आहे. त्यामुळे नागरिक व स्वयंसेवक यांच्यामध्ये वादाचा प्रश्नच नाही.

लसीकरणासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंटनुसारच नागरिकांचा नंबर लागत आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाचे धोरण पारदर्शक आहे. मात्र संघ स्वयंसेवक समाजाच्या मदतीला धावून आलेले पाहून अनेकांना पोटशूळ उठला व त्यांनी संघावर चुकीचे आरोप केले आहेत. संघाच्या कार्याला गालबोट लावण्याचा गलिच्छ प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत.

दरम्यान, समाजातील अधिकाधिक घटकांनी एकत्रित येऊन योगदान देऊया. या कोरोनाच्या संकटावर मात करूया, असे आवाहनही स्वयंसेवक संघाच्या वतीने श्रीकांत एकांडे व संदीप कुलकर्णी यांनी केली आहे.