शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोनाड्यातील अशोकस्तंभाला अठरा वर्षानंतर झळाळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:21 IST

सातारा : गेली अठरा वर्षे पोलीस मुख्यालयाच्या कोनाड्यात धूळखात पडलेल्या पितळी अशोक स्तंभाला आता झळाळी मिळणार आहे. पोलीस मुख्यालयासमोरील प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या बागेत सुमारे पंधरा फूट उंचीवर हा अशोक स्तंभ मोठ्या दिमाखात झळकणार आहे.सध्या जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालय परिसराचे सुशोभिकरण कार्य युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. अठरा ...

सातारा : गेली अठरा वर्षे पोलीस मुख्यालयाच्या कोनाड्यात धूळखात पडलेल्या पितळी अशोक स्तंभाला आता झळाळी मिळणार आहे. पोलीस मुख्यालयासमोरील प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या बागेत सुमारे पंधरा फूट उंचीवर हा अशोक स्तंभ मोठ्या दिमाखात झळकणार आहे.सध्या जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालय परिसराचे सुशोभिकरण कार्य युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. अठरा वर्षांपूर्वी रायफलमधील पितळी पुंगळ्यांचा वापर करून तयार करण्यात आलेला हा अशोकस्तंभ एका खोलीतच पडून होता. पोलीस मुख्यालयातील स्वच्छता मोहिमेवेळी हा अशोक स्तंभ स्वच्छपणे पुसून बाहेर आणण्यात आला. तेव्हा त्याची चकाकी लक्ष वेधून घेणारी होती. कधी काळी पोलीस खात्याकडून मोठ्या कष्टाने बनविण्यात आलेल्या या अशोक स्तंभाला अत्यंत चांगली जागा बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा स्तंभ पोलीस मुख्यालय इमारत समोरील हिरवळीत उभा करण्यात येणार आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या दुसºया बाजूला असलेल्या हिरवळीत ‘महाराष्ट्र पोलीस’ हा लोगोही पितळी धातूने बनवून घेऊन बसविला जाणार आहे.त्यानंतर या दोन्ही ठिकाणी आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यामुळे शतकोत्तर पोलीस मुख्यालय इमारतीचादर्शनी भाग अधिकच झळाळणार आहे.तब्बल ६५ किलो वजन..पोलीस खात्याच्या रायफलमधून वापरण्यात आलेल्या पुंगळ्या वितळवून हा अशोकस्तंभ बनविण्यात आला आहे. सुमारे अडीच फूट उंचीचा हा भरीव स्तंभ तब्बल ६५ किलो वजनाचा आहे. पंधरा फूट उंचीच्या खांबावर हा अशोक स्तंभ बसवून रस्त्यावरून येणाºया-जाणाºया प्रत्येक सातारकराला व्यवस्थित दिसावा, याचेही नियोजन पोलीस खात्याने केले आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्र पोलीस’ लोगोचा पुतळा हरियाणातील एका कारखान्यातून बनविला जाणार असून, यातही पुंगळ्या वापरल्या जातील.