शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

कॉँग्रेसचं अस्तित्व,भाजपची प्रतिष्ठा!

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

प्रचार शिगेला : शहराच्या इतिहासात प्रथमच अडवाअडवीची अन् जिरवाजिरवीची भाषा

राहीद सय्यद -- लोणंद -लोणंद नगरपंचायतीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. प्रमुख पक्षांनी प्रचारात ऐन उन्हाळ्यात धुरळा उडविल्याने लोणंदचे वातावरण कधी नव्हे एवढे तापले आहे. सुरवातीच्या टप्प्यात नेहमीप्रमाणेच होऊ पाहणारी निवडणूक भलतीच रंगात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे तर काँग्रेसही आक्रमक झाली असून, भाजपाने अस्तित्वासाठी झुंज देण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिवसेनेने उसनं अवसान आणलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या ऐन मध्यावर तिरंगी लढतीकडे लक्ष वेधले जात आहे.लोणंद नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेऊन उमेदवार देण्यातही आघाडी घेतली. पक्षातील इच्छुकांची भाऊगर्दी झाल्यामुळे राष्ट्रवादीपुढे मोठा पेच निर्माण झाला. त्यातूनच नाराजांनी अपक्ष उभे राहून रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीपुढे प्रश्न निर्माण झाला. मात्र आमदार मकरंद पाटील यांनी स्वत:च निवडणुकीत लक्ष घालून पॅनेलची रचना केली.राष्ट्रवादीने आखलेल्या रणनीतीमुळे प्रचारात आघाडी घेत वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. वास्तविक आमदार मकरंद पाटील यांनी वैयक्तिक भेटीवर भर देत प्रभागवार नियोजन केले. त्यातून पक्षाची बाजू मजबूत होत असताना अचानक काँग्रेसने आमदारांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. हा घाव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागल्याने निवडणुकीत आणखी रंगत येण्याची चिन्हे आहेत. मात्र, दोन्ही काँग्रेसमधील या खडाजंगीचा फायदा उठवत भाजपाने प्रचाराचा रथ वेगाने पळविण्याचे निश्चित केल्याचे बोलले जात आहे. एकीकडे भाजपाने पक्षाचे आमदार, मंत्री यांना प्रचारात उतरवित वातावरण प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील एकटेच खिंड लढवित आहेत. काँग्रेसने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवित तोडीस तोड दिली आहे. अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांच्या प्रचारधुरीने विरोधकांना पेच निर्माण झाला आहे.राष्ट्रवादीने दोन प्रभागांमध्ये अपक्षांना पुरस्कृत केले आहेत तर एकंदरीच अपक्ष उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केल्याने पक्षाचे बळ वाढले आहे. असे असले तरी संपूर्ण भीस्त आमदार मकरंद पाटील यांच्यावरच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत प्रत्येक प्रभागात टोकाची लढत दिसत असून, अपक्षांनीही तीन प्रभागांत जोर लावला आहे.लोणंदच्या आजपर्यंतच्या इतिहासात अडवाअडवीची आणि जिरवा जिरवीची भाषा पहिल्यांदाच एवढ्या आक्रमकपणे वापरली जात आहे. शहरातील सुविधा, विकासकामांतील भ्रष्टाचार या आरोप प्रत्यारोपांनी एकमेकांवर चिखलफेक केली जातेय तर याच चिखलफेकीतून नवख्या भाजपाने कमळ फुलविण्यासाठी चंग बांधल्याने सर्वांच्याच नजरा या निवडणुकीने लागल्या आहेत. पहिल्या नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष होण्यासाठी ही चुरस चालली असली तरी कोणाचा नगराध्यक्ष करायचा हे मात्र जनताच ठरवणार आहे.लोणंदनगरी ‘लोकमत’मय..लोणंदच्या प्रभावी रंग भरण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रचारसभेत आणि घराघरात लोकमतचीच चर्चा दिसून येते. एकमेकांवरील आरोप वास्तवातून ‘लोकमत’ने मांडले. शिवाय प्रचारातील बारकाव्यांसह निवडणुकीची रंगत समोर आणल्याने वाचकांना पर्वणी मिळाली आहे.