शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस शिल्लक राहणार नाही

By admin | Updated: February 16, 2017 23:15 IST

चंद्रकांत पाटील आक्रमक : मुंढे-गोटे येथील सभेत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कडाडून टीका

कऱ्हाड : ‘सातारा जिल्ह्यात भाजपला उमेदवार मिळणार नाहीत, अशी भविष्यवाणी करणाऱ्या पृथ्वीबाबांच्या काँग्रेसलाच आज अनेक ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता भाजपवर टीका करताना जरा विचारपूर्वक बोलावे. आणि जिल्ह्यात औषधाला तरी काँग्रेस शिल्लक राहतेय का हे बघावे,’ अशी बोचरी टीका सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. मुंढे-गोटे, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आदी उपस्थित होते.‘दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी भाजपची मदत घेतली होती. तसेच नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांना आमची मदत चालली होती. मात्र, हेच नेते आजही भाजपवर जातीयवादी म्हणून टीका करतात, तेव्हा आश्चर्य वाटते. आमची मदत घेतली तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का,’ असा खोचक सवालही सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केला.अतुल भोसले म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने कमळ फुलल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कऱ्हाडला जाहीर सभा दिली होती. त्या सभेत ‘तुम्हाला आम्ही नगराध्यक्ष पदाची भेट देऊ,’ असे सांगितले होते. आज प्रचाराची धामधूम असतानाही आपण पुन्हा एकदा कऱ्हाडला सभा घेतलीत. यावेळी पंचायत समितीच्या सभापतिपदाची भेट आम्ही तुम्हाला निश्चित देऊ. कऱ्हाड दक्षिणची खिंड लढविण्याची संधी तुम्ही विधानसभेला आम्हाला दिली आहे.’ (प्रतिनिधी)