शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आबांच्या गाडीभोवती काँग्रेसचा ग‘राडा’

By admin | Updated: April 12, 2016 00:42 IST

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली...

लोणंद : आमदार मकरंद पाटील हे रविवारी रात्री त्यांच्या वाहनामध्ये बसल्यानंतर त्यांच्या गाडीभोवती जमलेल्या काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. आमदार पाटील यांच्या वाहनावर चढून त्यांनी अक्षरश: ग‘राडा’ घातला. यावेळी आमदार मकरंद पाटील हे नगरपंचायतीच्या निवडणुकीत पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला गेला. तसेच त्यांच्या वाहनांची तपासणी करण्याची जोरदार मागणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले हे कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आमदार पाटील वाहनातून लोणंद पोलिस ठाण्यात आले. यावेळी सातारा, फलटण, शिरवळ, खंडाळा आदी ठिकाणांहून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. निवडणूक आयोगाचे भरारी पथकही लोणंद पोलिस ठाण्यात दाखल झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तक्रारीनुसार आमदार मकरंद पाटील यांच्या वाहनांची संपूर्ण तपासणी व्हिडिओ शूटिंगच्या सहाय्याने केली. यावेळी वाहनामध्ये आक्षेपार्ह कोणतीही गोष्ट आढळून आली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काँग्रेसचे सरफराज बागवान यांनी लोणंद पोलिस ठाण्यात आमदार मकरंद पाटील यांनी ‘वाहन बाजूला घ्या, म्हणाल्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केली.’ अशी तक्रार दाखल केली.या तक्रारीनुसार लोणंद पोलिस ठाण्यात आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, यासाठी आमदार मकरंद पाटील यांना पोलिस ठाण्यात मध्यरात्री पाच तास ताटकळत बसावे लागले. (वार्ताहर)विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली...‘लोणंद नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांना पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणारे माझी गाडी तपासल्यानंतर सत्य बाहेर येताच मूग गिळून गप्प बसले. त्यांनी केलेला प्रकार हा निंदनीय आहे,’मकरंद पाटील, आमदार पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी नेत्यांची फौजकाँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाल्यानंतर व आमदार मकरंद पाटील यांना घेराव घालत पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, खंडाळा पंचायत समितीचे सभापती नितीन भरगुडे-पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे, बाळासाहेब शेळके, अ‍ॅड. शामराव गाढवे, मनोज पवार आदी नेत्यांची फौजही लोणंद पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसली होती.