शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विटा पालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षच लढविणार

By admin | Updated: December 5, 2015 00:44 IST

पतंगराव कदम : विट्यामध्ये कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

विटा : सांगली मार्केट कमिटी सर्वांनी खाल्ली तरी ३८ कोटी रूपये शिल्लक राहिले. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव देण्यासाठी बाजार समित्या व शेतीपूरक संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. थोड्या पाण्यात व थोड्या शेतीत जास्त उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम उभा राहण्यासाठी आगामी काळात शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपविला पाहिजे, असे मत व्यक्त करून, अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपलेली विटा नगरपरिषद निवडणूक यावेळीही कॉँग्रेस पक्षच लढविणार असून त्यासाठी युवकांनी तयारीला लागावे, असे आवाहन माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले.विटा येथे मनमंदिर युथ फौंडेशनच्यावतीने आयोजित ‘मनमंदिर अ‍ॅग्रो’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कदम बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, रामरावदादा पाटील, जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी, सुहास शिंदे, कृष्णत गायकवाड, अ‍ॅड. सुमित गायकवाड, अ‍ॅड. अजित गायकवाड, सभापती आनंदराव पाटील उपस्थित होते.यावेळी डॉ. कदम म्हणाले, खानापूर तालुक्यात शेतीपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मी मंत्री असताना ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेचे २५० कोटी वीज बिल शासनाकडून भरले. परंतु, आता तसे होताना दिसत नाही. राज्य कुणाचे असावे हे आता जनतेला समजू लागले आहे. कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना फायदा होईल.अशोकराव गायकवाड यांचेही भाषण झाले. अ‍ॅड. अजित गायकवाड यांनी कृषी प्रदर्शन आयोजित करण्याचा हेतू विषद केला, तर अ‍ॅड. सुमित गायकवाड यांनी, आतापर्यंत जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले असून यापुढील काळातही जनतेची कामे करण्यासाठी अशोकराव गायकवाड यांना ताकद द्यावी, असे सांगितले. यावेळी आदर्श शेतकरी सुरेश शिंदे, काकासाहेब पाटील, प्रताप कचरे, प्रकाश गायकवाड, भगवान पाटील, रामभाऊ जाधव या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रतापराव साळुंखे, शांताराम कदम, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सुशांत देवकर, नगरसेवक अनिल म. बाबर, दिलीप आमणे, उत्तम चोथे, संजय भिंगारदेवे आदी उपस्थित होते. चंद्रशेखर यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)काँग्रेसची सूत्रे तरुणांच्या हातात देणार : मोहनराव कदमराजकारण करीत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले पाहिजे. यापुढील काळात कॉँग्रेसची सर्व सूत्रे जिल्ह्यातील तरूणांच्या हातात देणार असून मी फक्त सेनापती म्हणून काम करणार असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केले. तसेच तरूणांना त्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून शेती करण्याचे आवाहन केले.