शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

काँग्रेस नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय

By admin | Updated: September 6, 2016 23:49 IST

पृथ्वीराज चव्हाण : भैरवनाथनगरला विविध विकासकामांची उद्घाटने

कऱ्हाड : ‘विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरण्यासाठी आमच्या आघाडी सरकारने विदर्भास झुकते माप दिले होते. आम्ही कोणताही आकस बाळगून सरकार चालवले नाही; पण सद्याचे भाजप सरकार आकसाने पश्चिम महाराष्ट्राकडे पाहत आहे. त्याबरोबर काँग्रेसचे नेते टार्गेट करून त्यांच्या शिक्षण संस्थांवर छापे टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारने चालवला आहे. सरकारचे विकासापेक्षा द्वेषाचे राजकारण सुरू असून, हे खेदजनक आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. भैरवनाथ-काले, ता. कऱ्हाड येथील राजीव गांधी भवन या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन, भैरवनाथनगर ते टकलेवस्ती रस्त्याचे उद्घाटन तसेच विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. सरपंच सुभद्रा पाटील अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पै. नानासाहेब पाटील, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, इंद्रजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बामणे, सर्जेराव शिंदे, अ‍ॅड. ए. वाय. पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, कृष्णत थोरात, दिलीप पाटील, तालुका काँग्रेसचे प्रवक्ते पै. तानाजी चवरे, संघटक उदय पाटील-उंडाळकर, नितीन थोरात, रणजित देशमुख, भैरवनाथनगरचे उपसरपंच आर. एम. कोळी, जयकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार चव्हाण म्हणाले, ‘ सरकार विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकासाचे अंतर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. यांनी निवडणुकीआधी करायची ती गडबड केली. आता त्यांच्या पक्षातील मंडळींची अवस्था काय आहे, हे मी सांगायला नको. आता त्यांच्या पक्षातील मंडळींची अवस्था काय आहे, हे मी सांगायला नको. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रशासन स्वच्छ केले. या कालावधीत अनेक निर्णय मार्गी लागल्याचे मला समाधान आहे; पण हे माझे काम आमच्या मित्रपक्षाला आवडले नाही. वर्णाश्रम अधारीत समाजव्यवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ’प्रारंभी दानशूर ज्येष्ठ नागरिक मारुती यादव, संभाजी थोरात यांचा आमदार चव्हाण यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. आर. एम. कोळी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. (प्रतिनिधी)माजी आमदार कुणाशीही प्रामाणिक नाहीत!आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘माजी आमदार कधीही कुणाशी प्रामाणिक राहिलेले नाहीत. विलासराव देशमुख यांच्या मतदार संघात त्यांना सन्मान दिला. विविध विकासकामांची त्यांच्या हस्ते उद्घाटने केली. त्याही दिग्गजांशी हे माजी आमदार कृतज्ञ वागल्याचे विलासराव देशमुख साताऱ्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर सांगायचे. त्या कृतज्ञ व्यक्तीचा जनाधार खऱ्या अर्थाने जनतेने संपवला आहे. ते ३५ वर्षे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये होते. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी जिल्ह्यातील काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगावरील पक्षाची झूल आता निघाल्याने कुणाशीही आघाड्या करत ते भरकटत चालले आहेत.’